आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS सुसाइड : 2 वर्षे एवढी टफ ट्रेनिंग घेऊनही, आत्महत्येच्या निर्णयापर्यंत कसा पोहोचला 30 वर्षांचा IPS अधिकारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी सुरेंद्र दास यांच्या सुसाइड प्रकरणाने अनेकजण धक्क्यात आहेत. गेल्या बुधवारी त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. जवळपास 4 दिवस उपचारानंतरही ते वाचू शकले नाहीत. पण आयपीएस अधिकाऱ्याने अशाप्रकारे सुसाइड केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. कारण अत्यंत टफ ट्रेनिंगमधून हे आयपीएस अधिकारी तयार होत असतात. 


मानसिक, शारीरिकरित्या या अधिकाऱ्यांना अशाप्रकारे तयार केले जात असते की ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतील. IPS अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या ट्रेनिंगबाबतच आपण आज जाणून घेणार आहोत. 2013 बॅचचे आयपीएस अधिकारी अमोद नागपुरे यांनी एका मुलाखतीत हे सर्व सांगितले होते. 

 
सर्वात कठीण परीक्षेनंतर होते निवड 
IPS अधिकाऱ्याची निवड देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC द्वारे होत असते. UPSC च्या मेरीमध्ये निवड झाल्यानंतर IPS अधिकाऱ्याची सुमारे 2 वर्षे ट्रेनिंग होत असते. 3 टप्प्यातील या ट्रेनिंगमध्ये अधिकाऱ्यांना पोलिस खात्याच्या कामासंदर्भात सर्व पैलुंची माहिती दिली जाते. 4 पार्ट्समध्ये ही ट्रेनिंग असते. 

 

असे असतात 4 पार्ट्स...
- ट्रेनिंगची सुरुवात लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकेडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसुरीमधून होते. याठिकाणी 3 महिन्यांचा फाऊंडेशन कोर्स होतो. 
- त्यानंतर सरदार वल्लभभाई नॅशनल पोलिस अॅकेडमी (SVPNPA), हैदराबादमध्ये 11 महिन्यांचा बेसिक कोर्स (फेज -1 ट्रेनिंग) दिली जाते. 
- त्यानंतर 6 महीने डिस्ट्रीक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते. 
- नंतर 1 महिन्याची फेज-2 ची ट्रेनिंग सरदार वल्लभभाई नॅशनल पोलिस अॅकेडमी (SVPNPA), हैदराबादमध्ये असते. 

 
ट्रेनिंगमध्ये काय शिकवतात 
- बेसिक कोर्समध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या सर्व अधिकाऱ्यांचे एकत्र ट्रेनिंग होते. त्यांना ऑफिसर ट्रेनीस (OTs) म्हटले जाते. त्यात सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकतसेच देशातील सांस्कृतीक बाबींबाबत माहिती दिली जाते. डिसिप्लिन, एटिकेट्सही शिकवले जातात. 
- तीन महिन्यांनंतर ट्रेनिंगचा सेकंड फेज सुरू होतो. त्याला बेसिक ट्रेनिंग कोर्स म्हणतात. हैदराबादेत होणार्या या ट्रेनिंगमध्ये यंग ट्रेनिजना प्रोफेशनल पोलिस ऑफिसर्स बनवले जाते. त्यात इनडोअर, आऊटडोअर आणि क्वालिफाइंग सबजेक्ट्स शिकवले जातात. 
- इनडोअर सब्जेक्ट्समध्ये लॉ, क्रिमिनॉलॉजी, पोलिस लीडरशिप आणि मॅनेजमेंटची माहिती दिली जाते. 
- आऊटडोअर सब्जेक्ट्समध्येस फिजिकल फिटनेस, मॉब कंट्रोल, क्राऊड मॅनेजमेंट अशा विषयांचे सबजेक्ट्स आणि ट्रेनिंग दिली जाते. 
- इंटर्नल सिक्युरिटी आणि ह्युमन राइट्स शिकवले जाते. वेपन्स, अनआर्म्ड कॉम्बेट, असॉल्ट ट्रेनिंगही दिले जाते. 
- दोन आठवड्यांचा भारत दर्शनचा टूर असतो. त्यात अधिकाऱ्यांना देशातील विविध भागांमध्ये टूरसाठी नेले जाते. 

 
वेग वेगळ्या फोर्सबरोबर ट्रेनिंग 
- SVPNPA ममध्ये ट्रेनिंगदरम्यान ऑफिसर्सवा आर्मी, एअरफोर्स, नेव्ही आणि सेंट्रल आर्म्ड पुलिस फोर्सबरोबर अटॅच केले जाते. 
- सेकंड फेजमध्ये राज्याबाबत माहिती दिली जाते. त्यात प्रॅक्टीकल ट्रेनिंगही दिले जाते. 
- ऑफिसर्सना पोलिस स्टेशन आणि स्टेशन हाऊस ऑफिसर्स (SHO) ना हँडल करण्याची जबाबदारी दिली जाते. यादरम्यान सिरीयस ऑफेन्सचे इनव्हेस्टीगेशनही करावे लागते. ऑफिसर्सना डिस्ट्रीक्ट पोलिस हेडक्वार्टर्समध्ये अटॅच केले जाते. पोलिसिंग समजून घेण्यासाठी असे करतात. 

बातम्या आणखी आहेत...