Home | National | Delhi | How can Rahul Gandhi did M Phil without passing MA ? Jaitley's question

राहुल यांनी एम. ए. शिवाय एम. फिल. कसे केले? जेटलींचा प्रश्न

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 14, 2019, 09:05 AM IST

‘राहुल यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत, हे काँग्रेस विसरत आहे’

  • How can Rahul Gandhi did M Phil without passing MA ? Jaitley's question

    नवी दिल्ली | अमेठी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरात भाजपने राहुल गांधी यांचा पदवीचा वाद समोर आणला आहे. राहुल गांधी यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्याशिवाय एम. फिल. कसे काय केले, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी विचारला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘राहुल यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत, हे काँग्रेस विसरत आहे.’ जेटली यांनी हा प्रश्न राहुल यांच्या शपथपत्राच्या आधारे उपस्थित केला आहे. राहुल यांनी शपथपत्रात म्हटले आहे की, १९९४ मध्ये फ्लोरिडाच्या रॉलिन्स कॉलेजमधून बी. ए. केले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी १९९५ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी काॅलेजमधून एम. फिल. केले आहे.

Trending