आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी गुंतवणूक, कमी जोखमेसह या 4 स्टेप्सद्वारे उघडा आपली सिक्यॉरिटी एजन्सी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - मोठ्या महानगरांसोबतच छोट्या शहरांमध्येही सिक्यॉरिटी गार्ड्सची मागणी वाढत आहे. फॅक्ट्री, सोसायटी, मॉल, मल्‍टीप्‍लेक्‍स आणि इतर मोठ्या आयोजनांच्या व्यवस्थेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अशातच सिक्यॉरिटी कंपनी सुरू करणे उत्पन्नाचा एक चांगला मार्ग होऊ शकतो.

 

> हा व्यवसाय कमी गुंतवणूक आणि अत्यंत कमी जोखमीमध्ये सुरू होतो. यामध्ये कागदी कार्यवाही कमी असते आणि इतर कायदेशीर कार्यवाही नसल्यागत आहेत. आपण हा व्यवसाय थोड्याप्रमाणात सुरू करून आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील इतके याद्वारे कमावू शकता.   
 > सिक्यॉरिटी एजन्सी सुरू करण्याची प्रक्रियी लांबलचक आणि किचकट नाही. पण थोडी दगदग आणि थोडे पैसे खर्च करण्याची तयारी हवी. आम्ही आपणास हा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्यासाठी काय करायचे याबद्दल सांगत आहोत.

 
स्‍टेप 1 – एकट्याने उभी करू शकता कंपनी

> सर्वातआधी तुम्हाला एक कंपनी तयार करावी लागेल. मग ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप कंपनी किंवा प्रॉपराइटरशिप फर्म अशाप्रकारची कंपनी तुम्हाला सुरू करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप आणि प्रॉपराइटरशिप कंपनी उघडणे सोपे आहे आणि त्यांची दरवर्षी होणारी कागदोपत्री प्रक्रिया प्रायव्हेट कंपनीच्या तुलनेत कमी असते. तुम्ही तुमचा मित्र किंवा पत्नीसोबत पार्टनरशिप कंपनी सुरू करू शकता. यांपैकी प्रॉपराइटरशिप कंपनी परवडणारी असेल. या कामामध्ये आपण सीएची मदत घेऊ शकता. प्रॉपराइटरशिप कंपनीमध्ये दरवर्षी दाखल होणारी कागदपत्रांची कार्यवाही कमी प्रमाणात असते. 

 

स्‍टेप 2 – एजन्सीची नोंदणी 
> सिक्यॉरिटी एजन्सी सुविधा देण्याचे काम करते. यामुळे कंपनी सर्व्हीस टॅक्सच्या अंतर्गत येईल आणि तुम्हाला त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण जर 10 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना कामावर ठेवत असाल तर तुम्हाला ईएसआईद्वारे कंपनीची नोंदणी करावी लागेल आणि 20 पेक्षा जास्त असतील तर पीएफसाठी सुद्धा नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय तुम्हाला लेबर कोर्टमध्येही रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. 


पुढे वाचा...... आणखी 2 स्टेप्सविषयी...

बातम्या आणखी आहेत...