Home | Business | Business Special | how can start soya paneer business

3 ते 4 लाख रूपयांमध्ये सुरू करा सोया पनीरचा व्यवसाय, दर महिन्याला होऊ शकते 30 हजारांची कमाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:22 PM IST

सोया पनीरच्या बिझनेसचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या पूर्ण गणित

 • how can start soya paneer business

  नवी दिल्ली - रेग्युलर कमाईसाठी आपण जर एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर सोयीबीन पनी आपल्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. पनीरच्या या व्यवसायातून तुम्ही फक्त कमाईच नाही तर आपण थोडे कष्ट आणि समजादारीने काम केले तर तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकता. यासाठी फक्त 3 ते 4 लाख रूपयांची गुंतवणुक केल्यास आपण महिन्याला हजारो नाही तर लाखो रूपये कमवू शकता.


  फक्त 3 ते 4 लाख रूपयांत सुरू होईल काम
  > सोयाबीन पनीर तयार करण्यासाठी 3 ते 4 लाख रूपये खर्च करावे लागतात. यामध्ये मशीन्स आणि इतर रॉ मटेरियलचा समावेश आहे.
  > अंदाजे 2 ते 3 लाख रूपयांत आपल्याला बॉयलर, जार, सेपरेटर, छोटे फ्रीजर इत्यादी सामानाची खरेदी करावे लागेल,

  > त्यानंतर 1 लाखाच्या हिशोबाने पाहिजे तेवढे सोयाबीन खरेदी करावे लागेल.

  > सुरूवातीला सोयीबीन पनीर बनवण्याची जाण असणारा एखादा कारागीर तुम्हाला हायर करावा लागणार आहे. कारण व्यवसायाच्या सुरूवातीलाच तुमचे उत्पादस खराब व्हायला नको.

  कसे तयार होते सोयाबीन पनीर ?

  > सोयाबीन पनीर तयार करणे दुधाचे पनीर तयार करण्याइतके सोपे आहे. फरक इतका आहे की, यामध्ये सुरूवातीला तुम्हाला दुध तयार करावे लागेल.
  > यामध्ये सोयाबीन अगोदर सोयाबीनचे पीठ तयार करून 1:7 च्या प्रमाणात पाण्यासोबत उकळावे लागते.

  > बॉयलर आणि ग्रायंडरमध्ये एक तासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला 4 ते 5 लीटर सोयाबीनचे दुध मिळेत.

  > यानंतर दुधाला सेपरेटरमध्ये टाकण्यात येते. यामुळे दुध दह्यासारशे घट्ट होते आणि त्यातील शिल्लक असणारे पाणी वेगळे होते. ।

  > जवळपास 1 तासाच्या प्रक्रियेनंतर तुम्हाला 2.5 ते 3 किलोग्राम पनीर मिळेल.


  पुढे वाचा...दर महिन्याला किती होईल कमाई

 • how can start soya paneer business

  सुरूवातीची कमाई 30 हजार रूपये 

  > सोयबीनचे होलसेल दर जवळपास 3000 ते 3100 रूपये प्रति क्विंटल तर सोयाबीन पनीरचे बाजारमूल्य 200 ते 250 रूपये प्रति किलो आहे. 
  > तुम्हाला 1 किलो सोयीबीन मधून पूर्ण प्रक्रियेनंतर 2.5 किलो पनीर मिळते. त्याची किंमत जवळपास 500 रूपये आहे.  

  > अशाप्रकारे आपण दिवसभरात 10 किलो पनीर तयार केले तर त्याचा बाजारभाव जवळपास 2 हजार रूपये असतो. 

  > त्यामध्ये कामगार, वीज इत्यादींचा 50 टक्के जरी खर्च वजा केला तर त्या हिशोबाने आपल्याला 30 हजार रूपये मिळतात. 

  > आपण दररोज 30 ते 35  किलो पनीर तयार करून बाजारात विकण्यास यशस्वी झालात तर तुम्ही आरामात 1 लाख रूपये महिना कमाई करू शकता. 


  पुढे वाचा... कशी करावी प्लॅनिंग 

 • how can start soya paneer business

  अशाप्रकारे करा प्लॅनिंग

  > सोयाबीन पनीरचा मोठा प्रकल्प उभा करण्यासाठी आपल्याकडे भांडवल नसेल तर इतर लघु उद्योगाप्रमाणे आपल्याला देखील कर्ज मिळू शकते. 
  > त्यासाठी तुम्हाला आपला प्रोजेक्ट जिल्हा उद्योग कार्यालयात दाखल करावा लागेल. त्यानंतर नफा आणि होणारा खर्च यांचे आकलन करून तुम्हाला सबसिडीने कर्ज मिळेल.

  > यासाठी प्रत्येक वेळी केंद्र आणि राज्य सरकार एसएमई प्रोजेक्‍ट़ससाठी विना व्याज किंवा कमी व्याजदर असणारे कर्ज उपलब्ध आहेत.

   

  शिल्लक उरलेला प्रत्येक घटक येतो उपयोगात

  > सोया पनीर तयार करताना तुमच्याजवळ ढेपीच्या रूपात वेस्टेज प्रॉडक्ट शिल्लक राहते. या ढेपीपासूनही बरेज प्रॉडक्ट तयार केले जातात.  

  > या ढेपेचा उपयोग बिस्कीट तयार करण्यासाठी होतो. त्यानंतर जो प्रॉडक्ट शिल्लक राहतो त्यापासून बडी तयार होते. 
  > या बडीचा खाण्यामध्ये उपयोग होतो. हे प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत मानला जाते. 

Trending