आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - “ईडीची कुठलीही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित नाही. पंचवीस वर्षांपूर्वी साध्या स्कूटरवर फिरणारे देशातील शंभर नेते अचानक पाचशे कोटींचे मालक कसे काय होऊ शकतात याची चौकशी व्हावीच लागेल. राज व उन्मेष जोशींकडे पैसे कोठून आले याचा विचार करणार नाही काय?” असा प्रतिसवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, “ईडीची चौकशी लगेच लावता येत नाही. निवडणुका पाहून ती होत नसते. चौकशी लावायला दोन-तीन वर्षे लागतात. त्यामुळे राजकीय हेतूच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही.
सीटिंग जागांना हात लावायचा नाही...गणेशोत्सवात जागावाटप
भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपावर गणेशोत्सवात चर्चा होईल. एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, अशी मानसिकता दोन्ही बाजूंची आहे. त्याला काही अपवादही राहू शकतात. त्यात रिजनल बॅलन्सचाही विचार होईल, असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले...
> विधान परिषदेचे सभापती भाजपत येणार काय? या प्रश्नावर चर्चा सुरू असल्याचे उत्तर त्यांनी दिले. { साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत... “शिवाजी महाराजांचे वंशज भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे. पण सध्या चर्चा सुरू आहे. त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.’ { इतर पक्षांमधून भाजपमध्ये अनेक नेते येत आहेत. त्यामुळे जुन्या नेत्यांमध्ये असंतोष नाही...
आरक्षण कमी करण्याचा मुद्दा नाही
आरक्षणाचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मांडली होती. त्यामागे लाभ सर्वांना मिळतो की नाही ही भूमिका होती. तीच भूमिका सरसंघचालक भागवत यांनी मांडली. यात आरक्षण कमी करण्याचा मुद्दाच नाही, असे पाटील यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.