आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळा झाला सुरू, थंडीमध्ये एक्सटेन्शन बोर्ड ठरू शकतात मृत्यूचा सापळा, एक चूक घेऊ शकते तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - लांब वायर असलेले एक्सटेन्शन बोर्ड जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. मोबाइल चार्जरपासून ते अनेक प्रकारच्या इलेक्ट्रीकल इक्विपमेंटसाठी आपण त्याचा वापर करत असतो. पण जगभरातील तज्ज्ञांनी नुकताच याबाबत एक इशारा जारी केला आहे. सोशल मीडियासह जगभरातील न्यूज वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, हे बोर्ड तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः थंडीच्या दिवसांत थोडासाही निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. 

 

थंडीमध्ये होते ही मोठी चूक
>> नॅशनल सेफ्टी फायर अॅडमिनिस्ट्रेशनच्या एका रिपोर्टनुसार लोक कोणतीही माहिती न घेता, एक्सटेन्शन बोर्ड खरेदी करतात. त्यावर ते अनेक प्रकारची उपकरणे चालवतात. पण थंडीमध्ये त्यावर मिनी हिटर लावण्याची मोठी चूकही करतात. 
>> ऑनलाइन शॉपिंगच्या काळात सध्या मिनी हिटर्सचा वापर वाढला आहे. लोक त्याला अंथरुणावर किंव आसपास ठेवून झोपतात. पण हे एक्स्टेन्शन बोर्ड हेवी लोडसाठी तयार करण्यात आलेले नसतात, याकडे कोणीही लक्ष देत नाही. 


अशी होते चूक 
>> एक्सपर्ट्सच्या मते, लोक स्वस्त मिळतात म्हणून असे एक्सटेन्शन बोर्ड खरेदी करतात, ज्यात सर्ज प्रोटेक्शन नसते. म्हणजे यात मध्ये एक फ्यूज नसतो, जो हेवी लोड किंवा काही बिघाड झाल्यास बोर्डला बंद करतो. 
>> दुसरी चूक म्हणजे, यात हेवी लोड लावणे. फ्यूज नसलेल्या एक्सटेन्शन बोर्डमध्ये हेवी लोड चालतो. पण त्याचे सर्किट हळू हळू गरम होत असते. अनेक लोक ते रात्रभर चालवतात आणि दुर्घटना घडते. 


अशी होऊ शकते दुर्घटना 
>> रात्रभर हेवी लोडवर चालण्यामुळे सर्ज प्रोटक्शन नसणारे एक्सटेन्शन बोर्ड बंद होत नाही. त्यामुळे वायर गरम होत राहते. त्यामुळे त्यात आग लागते. पाहता पाहता घर आगीने व्यापले जाऊ शकते. अंथरून जवळ असेल तर धोका अधिक वाढतो. 


अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे एक्सटेन्शन बोर्ड
काही विदेशी वेबसाइट्समध्ये सांगण्यात आले आहे की, एकट्या अमेरिकेमध्येच 2009 ते 2013 दरम्यान एक्सटेन्शन बोर्डमुळे 56 हजार घरांमध्ये आग लागली आणि हजारो लोक मारले गेले. आता जगभरातील एक्सपर्ट्स सल्ला देत आहेत की, चुकूनही कधी एक्सटेन्शनवर हिटर लावू नका आणि सर्ज प्रोटेक्शन नसणारे बोर्डही खरेदी करू नका. 

बातम्या आणखी आहेत...