आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात भयावह स्थिती असतानाही लेखनाचा तोंडवळा तोच कसा..? सामाजिक वास्तवावर मराठी लेखकांचा प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, ग्रामीण व्यवस्थेत प्रचंड उलथापालथ होत असतानाही मराठी लेखनाचा तोंडवळा बदलत नाही. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. वैचारिक बांधिलकीचे साहित्य संपले काय? असा प्रश्न थेट संमेलनातील परिसंवादात मराठी लेखकांसमोर उपस्थित केला गेला. सेतुमाधवराव पगडी साहित्य मंचावर 'आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक' या विषयावर परिसंवाद झाला. समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र थोरात अध्यक्षस्थानी होते. डाॅ. श्रीकांत तिडके, डॉ. गणेश मोहिते यांचा त्यात सहभाग होता.

लेखनात समग्र चित्रण असावे : डॉ. मोहिते

जागतिकीकरणाचे फायदे घेत मराठी साहित्यिकांनी नव्वदीनंतर जागतिकीकरणाला विरोध केला. त्याचे कारण देताना संस्कृतीवरचे आक्रमण म्हटले होते. परंतु खासगीकरण अाणि उदारीकरणानंतर देशाची ५८% संपत्ती केवळ एक टक्का लोकांकडे एकवटली,विषमतेची दरी तयार झाली. सामान्य शेतकरी, मजूर यांचे शोषण सुरू झाले. देशाची सत्तासूत्रे कुणाकडे द्यायची हे भांडवलदार ठरवू लागले. हे समग्र चित्रण मांडणारे लेखन अद्याप झालेले नाही.

सद्य:स्थितीवर बोलले पाहिजे : डॉ. तिडके

दलित साहित्याने मराठी साहित्याला अंतर्मुख केले. हे साहित्य थेट व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. त्यामुळे दलित साहित्य बळकट झाले. शरद जोशींच्या 'इंडिया विरुद्ध भारत' या चळवळीने शेतकऱ्यांना आवाज मिळाला. त्याने आत्मभान मिळाले. परंतु सद्यस्थितीवर कोणी का बोलत नाही? लेखकाने केवळ टेबलवर बसून लिहिणे अपेक्षित नाही, तो रस्त्यावर उतरला पाहिजे. शेतकरी आत्महत्या होताना तो झडझडून जागा व्हायला हवा.

विस्तृृत मांडणीची दृष्टी असावी : डॉ. थोरात

सगळेच लेखक सहेतूक नसतात. समाज आणि साहित्याचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित करणारेही असतात. अशांनी व्यापक अन् विस्तृत मांडणीची दृष्टी घ्यावी. ढसाळांच्या कविता समजून घेताना दिलीप चित्रेंच्या कवितांचाही विचार करावा. समाज गेला खड्ड्यात असे म्हणणाऱ्यांची प्रेरणा समाजच असू शकते.

राजकीय वातावरणावर भाष्य

देशात बाबांचे प्रस्थ वाढले अाहे. एक माजी मुख्यमंत्री पहिल्यांदा २५ बाबांना समोर ठेवून शपथ घेतात, दुसऱ्या वेळी चोरून शपथविधीला सामोरे जातात.


हुकूमशाही गाजवत असताना हिटलरही घाबरलेलाच होता. त्याचा अंत त्यातूनच झाला. त्यामुळे कुणाची भीती बाळगू नका. हुकूमशाहीचा कालावधी लांबत नाही.

खुद्द पंतप्रधानांना मी ओबीसी आहे, असे सांगावे लागते. हे दुर्दैवी. त्याने जातीयवाद वाढला. दुसरीकडे पंडित नेहरूंची जात देशाला अद्याप कळत नाही, हेही लक्षात घ्यावे.

गरिबी हटवण्याच्या नादात लाेकशाही समाजवाद माॅडेल संपुष्टात अालेला अाहे, हे लक्षात घ्यावे. देशाची सूत्रे अाता भांडवलदारांच्या हाती गेली॑ ॑॑॑अाहेत, हेही समजून घ्यावे.
 

बातम्या आणखी आहेत...