gadget / कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे सिम कार्ड, जाणून घ्या या अॅपच्या मदतीने...

आपल्याकडे असलेल्या टेलीकॉम कंपनीचे अॅप डाउनलोड करावे लागेल

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 05:56:00 PM IST

यूटिलिटी डेस्क- सध्या सिम कार्ड घेण्यासाठी खोट्या ओळखपत्राचे प्रमाण खूप वाढले आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला माहित नसते की, आपण जे सिम कार्ड वापरत आहोत, ते कोणाच्या नावावर आहे. त्यामुळे या ट्रिक आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपण एअरटेल अॅपच्या मदतीने माहित करून घेऊ शकता की, आपले सिम कार्ड कोणाच्या नावावर नोंदणी केलेले आहे. यासाठी आपल्याकडे असलेल्या टेलीकॉम कंपनीचे अॅप डाउनलोड करावे लागेल. सर्व कंपन्यांची प्रक्रिया सारखीच असते.

अशी आहे प्रक्रिया...
सर्वात आधी प्ले स्टोरवर जाऊन एअरटेल अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही परवानगी मागितली जाईल. त्याला Allow करा.

आता येथे दिलेल्या एका कॉलममध्ये आपला मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर याच क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी अॅपमध्ये टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

लगेच, तुमचे अकाउंट ओपन होईल. त्यानंतर आपल्या अॅपवर सर्वात वरच्या बाजूला सिम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याचे नाव दिसेल. जर ते नाव तूमचे असेल तर ठिक नाहीतर समजून जा की, आपले सिम दुसऱ्याच्या नावावर आहे.

अॅपवर आपल्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे नाव असेल तर सर्वात आधी आपल्या सिमकार्ड कंपनीशी संपर्क करा. त्यांनी सांगितलेल्या आदेशांचे पालन करा आणि आपला मोबाइल क्रमांक आधारसोबत नोंदणी करा.

X
COMMENT