Home | Maharashtra | Pune | How many more generations of Pawar you will put in politics? : Fadanvis

'यांच्या' आणखी किती पिढ्या राजकारणात उतरवणार?; मुख्यमंत्र्यांचा पवारांना टाेला

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 09:41 AM IST

हे दिल्लीत नाही तर फक्त स्वत:च्या घरी जातील : चंद्रकांत पाटील

  • How many more generations of Pawar you will put in politics? : Fadanvis


    पुणे - ‘यांच्या’ पक्षातील आजोबांना पंतप्रधान व्हायचंय, पुतण्याला मुख्यमंत्री व्हायचंय, ताईंना मंत्री व्हायचंय, नातवाला खासदार व्हायचंय, दुसऱ्या नातवाला आमदार व्हायचंय.. हे सारं एकाच घराण्यात करायचंय, मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचंय? की फक्त सतरंज्या उचलायच्या? अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली.

    भाजपच्या बारामती येथील उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी सुट्टीचा दिवस साधून बारामतीत आयोजित केलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या घराणेशाहीवर संधान साधले. बारामती मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे कांचन कुल यांच्या प्रचारासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. आजोबांपासून नातवांपर्यंत सारे खानदानच राजकारणात उतरवता आहात, मग कार्यकर्त्यांनी कुणाकडे पाहायचे, असे फडणवीस म्हणाले.

    हे फक्त स्वत:च्या घरी जातील : पाटील
    या निवडणुकीत यांच्या घराण्यातले कुणीच दिल्लीत जाणार नाही, ते फक्त स्वत:च्या घरी जातील, अशा तिखट शब्दांत चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर निशाणा साधला. पंतप्रधानपद काय आणि आमदारपद काय, या घराण्यातील कुणीच लोकसभेत तर काय, पण पार्थच्या पराभवानंतर स्वत:च्या घरी तरी जाऊ शकतील का? असा प्रश्न पाटील यांनी केला.

Trending