आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मानवी शरीरात इंद्रिये पाचच की त्यापेक्षा जास्त? जाणून घ्या काय आहे सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाच्या शरीरात पाच इंद्रिये असतात, असे म्हटले जाते. आपण शाळेतल्या मुलाला विचारले तरी तो पाच इंद्रिये, असेच उत्तर देईल. काही जण तर सहाव्या इंद्रियासाठीही प्रसिद्ध असतात. यावर हॉलीवूडमध्ये सिक्स्थ सेन्स नावाचा चित्रपटही तयार झालेला आहे. पण आपल्याला यातील पूर्ण तथ्य माहिती नाही. खरं तर माणसाच्या शरीरात पाचपेक्षा जास्त इंद्रिये असतात. 


वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार, काही लोकांमध्ये तर 22 ते 33 इंद्रिये असू शकतात. यात तोल सांभाळणे, न पाहता शरीराचा अवयव कळणे, न पाहता की-बोर्डवर टायपिंग करणे, चालणे-फिरणे, गरम-थंड, वेदनांची जाणीव इत्यादींचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, काही इंद्रिये फक्त प्राण्यांमध्येच आढळतात. उदा. शार्क मासा आपल्या आजूबाजूला वीजप्रभारित परिसराचा शोध घेऊ शकतो. वाटवाघळाला पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्राचे ज्ञान होते. त्यानुसारच ते उडण्याची दिशा निश्चित करतात. 


द न्यूयॉर्क टाइम्समध्ये 54 वर्षांपूर्वी 15 मार्च 1964 रोजी प्रकाशित एका अहवालाच्या मते, माणसाला पाचपेक्षा जास्त इंद्रिये असतात. बर्नार्ड कॉलेजचे अमेरिकी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिचर्ड पी. यूत्ज यांनी केलेला प्रयोग आणि संशोधनावरून असा दावा करण्यात आला होता. भारतीय तत्त्वज्ञान आणि गीतेतदेखील मनुष्याचा ५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये असल्याचे म्हटले आहे. मन हे 11 वे इंद्रिय मानले गेले आहे.