आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक सांगणार तुम्ही किती वेळ ऑनलाइन आहात: रिमाइंडरही मिळणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया -  दररोज तुम्ही ऑनलाइन किती वेळ घालवता याची माहिती आता फेसबुक देणार आहे. दररोज फेसबुकचा वापर करण्याची वेळ मर्यादाही सेट करता येईल. एखाद्या युजरने टाइम लिमिट सेट केल्यास त्याची मर्यादा संपताच आता फेसबुकचा वापर थांबवा, असा रिमाइंडर मिळणे सुरू होईल. ‘युवर टाइम ऑन फेसबुक’ असे या नवीन फीचरचे नाव असेल. सोशल मीडियाची सवय कमी करण्यासाठी हे फीचर लाँच करण्यात आले आहे.   


ऑगस्टमध्ये  या फीचरचे ट्रायल झाले. ज्या युजरच्या फेसबुक अॅपमध्ये हे फीचर दिसत नाही त्यांना लवकरच अपडेट मिळेल.  फेसबुकवर सेटिंग्ज अँड प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर ‘युवर टाइम ऑन फेसबुक’ हे फीचर दिसेल. या फीचरमध्येच ‘मॅनेज युवर टाइम’ हा पर्याय मिळेल. याची निवड केल्यानंतर फेसबुक वापरण्याची वेळ मर्यादा निश्चित करता येईल. ही वेळ मर्यादा ओलांडल्यानंतर युजरला आपोआप रिमाइंडर मिळणे सुरू होईल. या पर्यायाच्या मदतीने मागील आठवड्यात दररोज फेसबुकवर किती वेळ घालवण्यात आला याची माहिती युजरला मिळत राहील. इन्स्टाग्रामवरही मागील आठवड्यात या पद्धतीचे फीचर जोडण्यात आले.  

 

जगभरात २४ तासांसाठी फेसबुक डाऊनची तक्रार 
मंगळवार-बुधवारी जगभरातील विविध भागांत फेसबुकवर अॅक्सेस करताना युजरला अडचणीचा सामना करावा लागला. २४ तासांपर्यंत फेसबुक डाऊन असल्याची तक्रार युजर्सनी केली. फोटो अपलोड करताना अडचणी अाल्या. मेसेंजरमध्ये काही नियमित अपडेट असल्याने युजर्सला अडचणीचा सामना करावा लागला. आता ही समस्या दूर करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले.

 

टि्वटरनंतर इन्स्टाग्रामही आता बनावट फॉलोअर्स हटवणार  
इन्स्टाग्रामने बनावट फॉलोअर्स हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ट्विटरने बनावट अकाउंटविरुद्ध मोहीम चालवत जवळपास ४ कोटी अकाउंट डिलीट केले होते. इन्स्टाग्रामवर ज्या युजरचे लाखो-कोटी फॉलोअर्स आहेत ते युजर एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात आणि त्या मोबदल्यात पैसे कमावतात. परंतु काही दिवसांपासून ज्या युजरचे काही हजार फॉलोअर्स असतील तेसुद्धा उत्पादनाचा प्रचार करून पैसे कमावत आहेत. याला नॅनोइन्फ्लुएन्स ट्रेंड म्हटले जाते. या ट्रेंडमुळे पैसा कमावण्यासाठी बनावट फॉलोअर्सची संख्या वाढवण्याचा प्रकार केला जात आहे.   

बातम्या आणखी आहेत...