आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारचे दार उघडण्यापूर्वी सीक्रेट सर्व्हिस एजंट करतात हे खास काम, प्रथमच झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात बलाढ्य देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासमवेत जणु सैनिकांची एक तुकडीच निघते. एका अभेद्य किल्ल्याप्रमाणे, त्यांच्या वाहनांचा ताफा निघतो. परंतु, हा ताफा जेव्हा थांबतो तेव्हा वेळीच राष्ट्राध्यक्षांना आपल्या कारमधून बाहेर पडता येत नाही. जोपर्यंत सीक्रेट सर्व्हिस एजंट त्यांना संकेत देत नाहीत तोपर्यंत त्यांना आपल्या कारमध्येच प्रतीक्षा करावी लागते. राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात 50 वाहने असली तरीही त्यांच्या दौऱ्यापूर्वीपासूनच हजारो पोलिस, अधिकारी आणि एजंट्स त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आणि सोबत राहून सेवा देतात. अनेकवेळा हायवे ब्लॉक केले जातात. हॉटेलांचे 3-3 फ्लोअर रिकामे केले जातात. काही वेळा राष्ट्राध्यक्षांची एंट्री किचनमधून केली जाते. हॉटेल स्टाफच्या प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासून पाहिली जाते. त्या सर्वांचा रेकॉर्ड सीक्रेट सर्व्हिस एजंट्सकडे असतो.


50 वाहनांच्या ताफ्यासह निघतात राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा व्हाइट हाऊसमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी तब्बल 40 ते 50 वाहनांचा एक ताफा असतो. त्यातही राष्ट्राध्यक्षांचे आणि त्यांच्या पत्नी किंवा पतीचे वाहन आणि व्हीआयपींसह व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या कार वेगळ्याच... या ताफ्यात जवळपास सगळीच वाहने बुलेटप्रूफ असतात. या वाहनांच्या ताफ्यात काउंटर अॅसॉल्ट टीम, सीक्रेट सर्व्हिस एजंट्स आणि बॉम्बशोधकांसह स्पेशल टीम्स अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि अवजारांसह सज्ज असते. राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यासमोर काही पोलिस वाहने ट्रॅफिक थांबवून रस्ता क्लिअर करत पुढे जात असतात. सर्वच 50 वाहने सॅटेलाइट कम्युनिकेशनशी कनेक्टेड असतात. 


कठिण समयी दोन भागांत विभाजित होतो ताफा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 50 वाहनांमध्ये बाहेर पडत असले तरीही त्यांच्या ताफ्याची दोन भागांत विभागणी केलेली असते. राष्ट्राध्यक्षांच्या वाहनांसारखेच इतरही वाहने असतात. जेणेकरून राष्ट्राध्यक्ष नेमक्या कोणत्या कारमध्ये आहेत याचा पत्ता लागत नाही.
पहिल्या भागाला "सिक्योर पॅकेज" असे संबोधले जाते. हल्ला किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास सिक्योर पॅकेज अचानक ताफ्यातून वेगळा केला जातो. त्यामध्ये दोन लिमोझीन, सीक्रेट सर्व्हिस एजंट्सची वाहने, स्थानिक पोलिस आणि मेडिकल स्टाफ इत्यादींचा समावेश असतो. राष्ट्राध्यक्ष आणि व्हीआयपी याच ताफ्यात असतात. या सर्वच कार प्रोफेशनल ड्रायव्हर्सकडून चालवल्या जातात. 
दुसऱ्या भागात व्हॅन, व्हाईट हाउस स्टाफ, प्रेस आणि संवाद यंत्रणांसह सुरक्षा रक्षकांचे पथक असतात. ही सगळेच हायस्पीड कम्युनिकेशन आणि थेट प्रक्षेपणाची सुविधांनी सुसज्ज असतात. कठिण समयी मार्ग कसा काढावा हे पूर्वनियोजित असते. त्यानुसार, रुट निर्धारित केला जातो. 


राष्ट्राध्यक्षांना कारमध्येच करावी लागते प्रतीक्षा...
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर वेळीच कारचे दार उघडले जात नाही. सर्वप्रथम ताफ्यासमोर असलेले पोलिस आणि एजंट्स वाहनांमधून उतरून ताफ्यासमोर सुरक्षेचा आढावा घेतात. मागचे सुरक्षा रक्षक मागून बंदोबस्त लावतात. यानंतर त्यापैकी काही पोलिस आणि एजंट्स राष्ट्राध्यक्षांच्या वाहनाच्या डाव्या आणि उजव्या दिशेला निघतात. सर्वच बाजूंनी सुरक्षा बंदोबस्त आहे का याची तपासणी केली जाते. 
- सोबतच, हल्ला झाल्याच्या परिस्थितीत ज्या मार्गातून निघण्याची योजना आहे तो रस्ता क्लिअर आहे का याची पाहणी केली जाते. यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या The Beast नावाच्या विशेष कारमधून मुख्य सुरक्षा अधिकारी उतरतो आणि प्रवेश मार्गाची पाहणी करतो. केवळ जमीनच नव्हे, तर आकाशात सुद्धा सुरक्षा रक्षकांची करडी नजर असते. त्यानंतरच राष्ट्राध्यक्षांच्या वाहनातील इतर अधिकाऱ्यांना ऑल क्लिअरचा संदेश मिळतो आणि राष्ट्राध्यक्ष कारमधून बाहेर येतात. 

 

बातम्या आणखी आहेत...