Home | Khabrein Jara Hat Ke | How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

250 वर्षांपूर्वी असे व्हायचे ऑपरेशन; पेशंटला पाजायचे दारू, पाहा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:03 AM IST

150 ते 200 वर्षांपूर्वी डॉक्‍टर याच शस्‍त्रक्रिया कशा करत होते, याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  वैद्यकशास्‍त्राने प्रगती केल्‍यामुळे मृत्‍यूदर कमी झाला. आजघडीला मनुष्‍याचे हृदय, किडणी, मेंदू यासारख्‍या नाजुक भागांवर अगदी सहजतेने शस्‍त्रक्रिया केली जाते. पण, 150 ते 200 वर्षांपूर्वी डॉक्‍टर याच शस्‍त्रक्रिया कशा करत होते, याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

  > 18 व्‍या शतकापूर्वी शस्‍त्रक्रियेवर आधारित 'क्रुसियल इन्हेन्शन्स' नावाचे एक पुस्‍तक 150 वर्षांपूर्वी प्रकाशित झाले.
  > या पुस्‍तकांमध्‍ये केवळ शस्‍त्रक्रिकेचा इतिहासच दिला नाही महत्‍त्‍वाचे दस्‍तावऐवज उघड केले आहेत.
  > शिवाय सोबत दुर्मिळ फोटोजसुद्धा दिले.
  > हे सगळे फोटो आणि माहिती 1800 व्‍या शतकातील आहे.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भुलेच्‍या औषधीऐवजी पाजत दारू आणि पाहा शस्‍त्रक्रियेचे दुर्मिळ फोटोज...

  (फोटो सौजन्‍य : वेलकम कलेक्‍शन लायब्रेरी)

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  भुलेच्‍या औषधीऐवजी पाजत दारू 18 व्‍या शतकात भूल देण्याचे (अ‍ॅनेस्थेशिया) तंत्र विकसित झाले नव्‍हते. कुठलीच भूल न देता रुग्‍णावर शस्‍त्रक्रिया केली जाईची. शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाला प्रचंड वेदना सहन करायला लागायच्या. काही वेळा दारू पाजून रुग्णाला बेशुद्ध करीत असत.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  1846 मध्‍ये एका तत्‍कालीन डॉक्‍टरने लिहिलेच्‍या पुस्‍तकातील हा फोटो आहे. रुग्‍णाला जिभेचा कँसर झाला होता. त्‍यावर इलाज करण्‍यासाठी या पद्धतीने जीभ कापली होती.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  या पुस्‍तकात 1840 मधील एक चित्र दिलेले आहे. अनैसर्गिक प्रसूतीच्‍या काळात मातेला कसा त्रास सहन करावा लागत होता, हे यातून दिसते. महिलेला भूल न देता तिचे पोट कापून त्‍या काळात बाळ बाहेर काढले जात होते.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  त्‍या काळात ज्‍या महिलांचे सीजेरियन करावे लागायचे त्‍यांच्‍या वाचण्‍याची शक्‍यता केवळ 20 टक्‍के होती. परिणामी, महिला सीजेरियनला प्रचंड घाबरत असत.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  'क्रुसियल इन्‍वेन्‍शंस'मध्‍ये जवळपास सर्वच प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिकेबाबत माहिती दिली आहे. कुण्‍या रुग्‍णाच्‍या पायावर शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी त्‍याला चाकूने कापावे लागे, हे यात सचित्र सांगितले आहे.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  डोळ्यांवर शस्‍त्रक्रिया करतानाचा हा फोटो 1846 मधील आहे. ही शस्‍त्रक्रिया केली तेव्‍हा भूल देण्‍याचे औषध नव्‍हते.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  हे चित्र 1841 मधील आहे. स्‍तनाचा कर्करोग झालेल्‍या एका महिलेवर शस्‍त्रक्रिया करताना ते रेखाटले गेले होते.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  शस्‍त्रक्रियेचा इतिहास उलगडणारे हे पुस्‍तक 150 ते 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले आहे. त्‍या काळात तोंडाच्‍या गंभीर आजारावर शस्‍त्रक्रिया कशी केली जात असे याची माहिती त्‍यातून मिळते. हा फोटा याच पुस्‍तकामधला आहे.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  तोंडाच्‍या जबड्यावर 150 ते 175 वर्षांपूर्वी या पद्धतीने ऑपरेशन केले जात होते.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  150 वर्षांपूर्वी रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी या अवजारांचा डॉक्‍टर वापर करत होते.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  हे रेखाचित्र 250 वर्षांपूर्वीचे आहे. यात एका महिलेवर नेत्रशस्‍त्रक्रिया सुरू असल्‍याचे दाखवले आहे. शिवाय ही शस्‍त्रक्रिया कशी केली गेली, याचे विवरणही यात दिले आहे.

 • How Surgeries Done 250 Years Before See Amazing Facts

  1844 मध्‍ये रेखाटलेल्‍या या चित्रांमधून मनुष्‍याच्‍या मेंदूवरही त्‍या काळात शस्‍त्रक्रिया केली जात असल्‍याचे दाखले मिळतात.

Trending