Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | how to avoid problems, motivational story, importance of hard work

यशाचे सूत्र : कधी-कधी अडचण लहान असते, पण आपणच त्याला मोठे संकट समजतो

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 09, 2019, 11:53 AM IST

शेतकऱ्याच्या शेतात फसलेला होता एक मोठा दगड, दगडामुळे व्हायचे त्याच्या अवजारांचे नुकसान

 • how to avoid problems, motivational story, importance of hard work

  जीवन मंत्र डेस्क - एका लोककथेनुसार पुरातन काळा एका शेतकऱ्याच्या शेतात एक दगड फसलेला होता. त्या दगडाच्या ठेचेमुळे त्याला अनेकवेळा दुखापत झाली होती. तो दगड अनेक दिवसांपासून तेथेच फसलेला होता. शेतीची कामे करताना दगडामुळे अनेकवेळा शेतीच्या अवजारांचे नुकसान होत होते. शेतकऱ्याला वाटायचे हा दगड खूपच मोठा असेल. यामुळे याला येथून हटवणे शक्य होणार नाही. असाच विचार करत अनेक वर्ष निघून गेले.

  > एकेदिवशी शेतात काम करत असताना दगडामुळे शेतकऱ्याचा नांगर तुटला. यामुळे शेतकऱ्याला राग अनावर झाला. दगडामुळेच दरवेळी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्याने दगडाला काढून टाकण्याचा विचार केला. शेतकऱ्याने आपल्या गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. सर्वजण दगड काढण्याच्या तयारीला लागले.

  > सर्वांना वाटत होते की दगड खूप मोठा आहे. याला येथून हटविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार. पण काही वेळातच दगड जमिनीतून बाहेर आला. हे पाहून सर्वजण हैराण झाले. कारण त्यांनी विचार केला तितका तो दगड मोठा नव्हता. शेतकऱ्याला आनंदही झाला आणि स्वतःवर हसू आले. त्याने विचार केला की, हा तर लहान दगड होता. मी एकटा देखील याला हटवू शकत होतो. मी माझ्या विचारामुळे या लहान अडचणीला मोठे मानले होते. यामुळे माझे बरेच नुकसान झाले.

  कथेची शिकवण

  > या गोष्टीतून शिकवण अशी की, कधी-कधी आपण लहानतल्या लहान अडचणींना मोठे संकट समजतो. त्या अडचणींपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः नुससाचा सामना करतो. आपण जर अडचणींचा सामना केला तरच समस्या दूर होऊ शकतात.

Trending