Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | how-to-become-successful-person

यशस्वी होण्याचा अष्टमंत्र

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:09 PM IST

आपल्यात दडलेल्या कोणत्या कमतरतांवर मात करून तुम्ही श्रीमंत बनू शकाल.

 • how-to-become-successful-person

  आजच्या आर्थिक युगात प्रत्येक व्यक्ती पैशांच्या मागे धावतो आहे. पैशांशिवाय जगात काहीच नाही, असे सर्वसाधारण मत बनले आहे. सबसे बडा रुपय्या, हेच आजचे सूत्र बनलंय. पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. दिवस-रात्र त्यामागेच धावत असतात. पैसे कमविण्याच्या नादात लोक नात्यांतील मर्यादाही विसरतात.

  जर आपल्याला धनवान बनायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्या कमतरता आणि सवयींची माहिती तुम्हाला हवी. तुमच्या कोणत्या सवयी प्रगतीमध्ये अडथळा बनताहेत, याचीही तुम्हाला चाचपणी करावी लागेल. आपल्यात दडलेल्या कोणत्या कमतरतांवर मात करून तुम्ही श्रीमंत बनू शकाल. जर तुम्ही स्वतः खूप मेहनत न घेता परिस्थितीवर किंवा इतरांवर आरोप करीत राहिला, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही.
  यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा मार्ग स्वतः तयार करावा लागेल. परिस्थितीला आपल्यासाठी अनुकूल बनवणे, तुम्हाला शिकावे लागेल. जेव्हा तुम्ही परिस्थितीवर विजय मिळवू शकाल, त्यावेळी तुम्ही यशस्वी होण्याची पहिली पायरी चढलेली असेल. खाली दिलेले गूण कोणत्याही व्यक्तीला यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

  - वेळेचे महत्त्व समजायला शिकले पाहिजे.

  - आजचे काम उद्यावर ढकलू नका. कारण जे काम तुम्ही उद्यावर ढकलत आहात. त्यातील बरेचसे काम न होण्यासारखे आहे.

  - शक्य असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे काम करा. आवडीचे काम केल्यास तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

  - जेव्हा तुम्ही पूर्ण उत्साह, धैर्य आणि निष्ठेने कोणतेही काम कराल, तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

  - कोणतेही काम योजनाबद्ध पद्धतीने करा आणि कामाची सुरवात लवकरात लवकर करा.

  - लक्ष्य निर्धारित करून त्यानंतर संपूर्णपणे झोकून देऊन काम केले पाहिजे.

  - अधिक संपत्ती मिळवण्यासाठी अधिकाधिक अनुभवी आणि योग्यतेच्या व्यक्तींबरोबर संपर्क करावा.

  - कोणाचेही मन दुखवू नका. खरं बोलण्यासाठी साहस लागते.

Trending