सावधान: Petrol भरण्याच्या / सावधान: Petrol भरण्याच्या पाइपनेच चालतो चोरीचा खेळ, रोखण्यासाठी कोर्टात दिली ही Idea

दिव्य मराठी वेब टीम

Aug 27,2018 02:48:00 PM IST

न्यूज डेस्क - पेट्रोल पंपावर डीझेल आणि पेट्रोल चोरीच्या घटना इतक्या वाढल्या आहेत की अनेकांसाठी तो रोजचा त्रास बनला आहे. याच प्रकरणांच्या वाढत्या तक्रारींवरून मध्यप्रदेशातील इंदूर येथे लोक अदालतमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यातून पेट्रोप पंपांवर पारदर्शक पाइप लावण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, अशाने पेट्रोलची चोरी थांबवली जाऊ शकते. कोर्टाने या प्रकरणात कलेक्टर आणि फूड कंट्रोलरला नोटीस जारी करून 21 सप्टेंबर पर्यंत उत्तर मागितले आहे.


दोन मिनिटांत असे करा चेक
- पेट्रोल पंपावर आपलीही फसवणूक होत असल्याचे वाटत असल्यास अवघ्या काही मिनिटांत त्याची चाचणी करता येईल. यासाठी आपल्याला फिल्टर पेपरवर फक्त 2 थेंब इंधन टाकावे लागेल. सुरुवातीला डिलिव्हरी नोझलच्या तोंडाला साफ करा. नोझलने फिल्टर पेपरवर पेट्रोलच्या दोन थेंब टाका. दोन मिनिटांत पेट्रोल फिल्टर पेपरवरून उडून जाईल. सुकल्यानंतरही पेपरवर डाग राहत असेल तर पेट्रोलमध्ये भेसळ आहे.
- यासाठी आपल्याला फिल्टर पेपर सुद्धा खरेदी करण्याची गरज नाही. आपण पेट्रोल पंप संचालकाकडे याची मागणी करू शकता. फेडरेशन ऑफ मध्य प्रदेश पेट्रोल-डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष पारस जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, अनेक लोक पेट्रोलमध्ये सॉल्वेंट मिसळतात. त्यामुळे पेट्रोल भेसळ असले तरीही पेपर टेस्टमध्ये पकडले जात नाही. अशात आपण डेन्सिटी चाचणी करू शकता. पेट्रोलची घणता 730 ते 800 असल्यास ते शुद्ध मानले जाते. 730 पेक्षा कमी किंवा 800 पेक्षा जास्त असल्यास ते भेसळयुक्त आहे असे म्हटले जाईल. डीझेलच्या बाबतीत शुद्धतेचे प्रमाण 830 ते 900 या दरम्यान आहे.

डेन्सिटी जारनेही करू शकता टेस्ट
- फिल्टर पेपरने तपासल्यानंतरही आपल्याला इंधनाच्या शुद्धतेवर शंका असल्यास आपण डेन्सिटी जारने टेस्ट करू शकता. डेन्सिटी चेक करण्यासाठी आपल्याला 500ml जार, हायड्रोमीटर, थर्मोमीटर आणि ASTM (अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग ऑफ मटेरियल्स) कन्वर्झन चार्जची गरज पडणार आहे.
- हायड्रोमीटर कुठल्याही द्रव पदार्थाची घणता मोजण्याचे उपकरण आहे. हे सर्वच पेट्रोल पंपांवर उपलब्ध असते. डेन्सिटी जारमध्ये घणतेच्या वेग-वेगळ्या टेम्प्रेचरवर फरक तंतोतंत काढले जाऊ शकते. ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार, प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल मोजण्याचा अधिकार आहे.
- अनेकवेळा नोझलमध्ये छेडछाड करून 100 ते 150ml पर्यंत इंधन चोरले जाते. आपल्याला ही शंका आल्यास 5 लीटर टेस्ट करायला हवी. पेट्रोल पंपावर 5 लीटरचे एक प्रमाणित भांडे असते. आपण त्या भांड्यात पेट्रोल टाकून योग्य मोजमाप करू शकता.


भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्यास काय करावे...
प्रत्येक पेट्रोल पंपावर कंपनीच्या अधिकाऱ्यांचा नंबर लिहिलेला असतो. आपण त्या क्रमांकावर संपर्क साधून थेट तक्रार करू शकता. सोबतच ग्राहक मंचात सुद्धा यासंदर्भात तक्रार केली जाऊ शकते आणि पेट्रोल विक्रेत्याकडून भरपाईची मागणी करता येते. कंपनीमध्ये तक्रार दाखल केल्यास पेट्रोल पंप संचालकांना कारणे दाखवा नोटीस आणि दंड सुद्धा आकारला जातो.

X
COMMENT