आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करत आहात ऑनलाइन पेमेंट, तर मग आधी करा हे काम, नाहीतर होईल नुकसान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भलेह एखादी मोठी कंपनी असेल किंवा सरकारी वेबसाइट, जर त्या वेबसाइटवर या दोन खुणा नसतील तर सावधान झाले पाहिजे. जर अशा असुरक्षित वेबसाइटवरून तुम्ही पेमेंट केली असेल तर, तुमची खासगी माहिती सायबर चोरांकडे जाऊ शकते. 

 

करायचे असेल हे काम 
तुम्हाला एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अप्लाय करायचे असेल, सरकारी कामाची फीस भरायची असेल किंवा शॉपिंग करायची असेल तर आता बहुतेक पेमेंट ऑनलाइल झाल्या आहेत. या पेमेंट करायला आपल्याला आपल्या कार्डची डिटेल्स द्यावी लागते. सायबर जगतात या माहितीला चोरांच्या हाती लागण्यापासून वाचवणे कठीण असते. त्यामुळे कोणत्याही बेवसाईटवर पेमेंट करतेवेळी HTTPS आणि Padlock च्या खुणांना नक्की पाहावे.
 
HTTP आणि HTTPS वेगवेगळे असतात
याचा अर्थ HyperText Transfer Protocol Secure म्हणजेच या वेबसाइटवर जे कम्यूनिकेशन होत आहे ते सेक्योर आहे. पेमेंट करतेवळी नक्की पाहा की, वेबसाइटच्या नावावूर्वी HTTPS लिहीले आहे का नाही. यातून जे काही कम्यूनिकेशन होत आहे ते कोड भाषेत होत आहे, त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीच्या हाती ते लागत नाही.

 
padlock हिरव्या रंगच्या मेसेजमध्ये लपलेला असतो
याचा अर्थ आहे की, अॅड्रेस बारमध्ये जो अॅड्रेस आहे, तुम्ही त्यालाच कनेक्ट होत आहात, आणि तिसरा कोणी याला हॅक करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक वेबसाइटच्या मागे HTTP लिहीलेले दिसेल, ज्याचा अर्थ असतो Hypertext Transfer Protocol पण HTTPS फक्त त्याच वेबसाइटच्या अॅड्रेस बारमध्ये असते ज्या तुमच्या पेमेंटला सेक्योर करत आहेत. जर हिरव्या रंगासोबत कंपनीचे नावही हिरवे दिसत असेल तर अशावेळी कंपनीने ईवी घेतले आहे, म्हणजेच Extended Validation certificate. हे अजून सेक्योर असते.

 
 
या खुणा असतील तर व्हा सावधान
ग्रे पेडलॉकसोबत पिवळ्या रंगाचा धोकादायक ट्राअँगल असेल तर, त्यावरून केलेल्या पेमेंटमुळे तुमच्या खासगी अकाउंटी माहिती लीक होउ शकते.
 
Grey padlock सोबत लाल रंग अढळल्यास धोकादायक वेबसाइट असल्याचे समजावे. अशा वेबसाइटवरून तुम्ही जो काही डेटा शेअर कराल तो सेक्योर नसेल. त्यामुळे अशा वेबसाइटवर तुम्ही आपल्या बँक डिटेल्स कधीही शेअर करू नका.

बातम्या आणखी आहेत...