Home | Business | Personal Finance | How To Check Who Used My Aadhar Card In A Minute, Watch Online Process

तुमच्या Aadhar कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? या Trick ने एका मिनिटांत जाणून घ्या, समोर येईल यादी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 01:01 PM IST

आपल्याला केवळ 2 स्टेप्स फॉलो करून आधारचा कुठे-कुठे आणि कसा वापर होत आहे याची माहिती मिळू शकते.

 • How To Check Who Used My Aadhar Card In A Minute, Watch Online Process

  बिझनेस डेस्क - भारतात आधार कार्ड आता जवळपास प्रत्येक वस्तू आणि आवश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हे फक्त एक कागद नव्हे, तर यावर आपले युनिक आयडी नंबर, बोटांचे ठसे, डोळ्यांचे युनिक कोड आणि अतिशय गोपनीय अशी माहिती आहे. त्यामुळे, अशा कार्डची काळजी घेणे तेवढेच गरजेचे बनले आहे. बँक खात्यापासून सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंत आवश्यक बनलेल्या तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? आणि होत असेल तर त्याची माहिती कशी मिळवाल? याची सरळ आणि सोपी माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आपल्याला केवळ 2 स्टेप्स फॉलो करून आधारचा कुठे-कुठे आणि कसा वापर होत आहे याची माहिती मिळू शकते. या संपूर्ण माहितीच्या प्रक्रियेसाठी फक्त 1 मिनिट लागेल.


  अशी आहे माहिती मिळवण्याची प्रोसेस
  STEP-1 : सर्वप्रथम www.uidai.gov.in वेबसाइट ओपन करा. यानंतर Aadhaar Authentication History च्या पर्यायावर क्लिक करा.

  STEP-2 : दिलेल्या रकान्यात आपले आधार क्रमांक आणि सिक्यॉरिटी पिन टाका. यानंतर आपल्याला किती दिवसांचा डेटा हवा आहे अशी विचारणा केली जाईल त्या ठिकाणी 6 महिने टाइम सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो टाकताच आपल्यासमोर आधार कार्ड कुठे वापरला जात आहे याची संपूर्ण यादी मिळेल. ही यादी आपण डाऊनलोड देखील करू शकता.


  नोट : आधार कार्डशी संबंधित कोणतेही काम ऑनलाईन करत असताना आपल्याला UIDAI कडून एक गुप्त OTP (One Time Password) मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो. ओळख पटवण्यासाठी पाठवला जाणारा हा OTP कुणासोबतही शेअर करू नये. कारण, OTP शिवाय आधारशी संबंधित कुठलेही काम होत नाही.

Trending