आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही RO वॉटर प्यूरीफायरचा वापर करत असाल, तर या पार्टवर लक्ष देणे गरजेचे आहे, खराब झाल्यावर करू शकतो तुम्हाला आजारी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- तुमच्या घरी RO वॉटर फिल्टरचा वापर होत असेल तर मग त्याच्या फिल्टरला साफ ठेवणे गरजेचे आहे. फिल्टर कार्ट्रिज 6 महिन्यात खराब होत असते. जर या पार्टला नियमीत बदलले नाही तर मग मशीनचे दूसरे पार्ट्स जसे मेम्ब्रेन आणि फिल्टर खराब होऊ शकतात. फिल्टर कार्ट्रिजला घरबसल्या सोप्या पद्धतीने बदलू शकता. यामुळे तुम्हाला कोणाला सर्विसींगचे पैसेदेखील देण्याची गरज नाहीये. याला बदलण्यासाठी आधी जुन्या कार्ट्रिज बॉक्सला बाहेर काढा. जर कार्ट्रिज पिवळी दिसत असेल तर समजून जा की, ते खराब झाले आहे. त्यासोबतच नवीन कार्ट्रिज लावण्यापूर्वी त्यातील घाण पाणी काढून टाका. कार्ट्रिज काढण्याती संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओमध्ये पाहा.


असे चेक करा फिल्टर
तुमच्या घरात वापरण्यात येणाऱ्या वॉटर प्यूरिफायरचे पाणी फिल्टर आहे का नाही, याची माहिती पाण्याच्या TDS(टोटल डिझॉल्व्ड सॉलिड) लेव्हलवरून माहित होते. पाणी फिल्टर झाल्यानंतर त्याचा TDS 10 ते 50 च्या मध्ये ठेवला जातो. अनेक लोक याला 10 ते 15 च्या दरम्यानदेखील ठेवतात. अशातच जर पाण्याचा TDS कमी होत नसेल तर पाणी फिल्टर होत नाहीये. TDS चेक करायचे मीटर 200 रूपयांत मिळून जाते.

आजारपणाची भीती
अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, विदिशाच्या सर्जरी विभागाचे डॉक्टर नीरज जैन (MS जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांनी सांगितल की, जर प्यूरीफायरचे पाणी फिल्टर नसेल तर मग त्याने अनेक आजार होऊ शकतात.

> पाण्यात कॅल्शियम जास्ती झाल्यास, लीव्हर किंवा किडनीमध्ये स्टोन बनू शकतो.
> हार्ड पाणी पिल्यानंतर डायझेशन खराब होणे, पोटात दुखणे किंवा पित्ताची समस्या होऊ शकते.
> केस गळती होऊ शकते
> प्यूरीफायरमध्ये UV (अल्ट्राव्हायलेट प्यूरिफिकेशन) चा वापर बॅक्टेरीया मारण्यासाठी केला जातो, पण जर बॅक्टेरिया मेले नाही तर ज्वाइंडिस सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.
 

बातम्या आणखी आहेत...