Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | How to Clean Your Blood

अशुद्ध रक्ताने भेडसावतात पिंपल्स येणे, थकवा जाणवणे यांसारख्या समस्या,यातून मुक्त होण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 03:22 PM IST

आहारात करा या ९ गोष्टींचा वापर, आपले रक्त राहील शुद्ध , चाऱ्यावर राहील कायम तेज

 • How to Clean Your Blood

  न्यूज डेस्क - शरीरातील सर्व उपयुक्त घटक रक्ताभिसरण क्रियेच्या माध्यमातून इतरत्र पसरत असतात. शरीरात ऑक्सिजन पोहचण्यापासून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम देखील रक्तामार्फतच होत असते. रक्त शरीरातील PH चे प्रमाण व पाण्याचे प्रमाण देखील नियंत्रित करते. शरीरातील आवश्यक भागास पोषण देणे तसेच. वेस्ट प्रॉडक्ट्स, हार्मोन्स आणि इतर पेशींच्या वाहतूकीचे कार्य देखील रक्तामार्फत केले जाते.

  बऱ्याचदा अनावश्यक व घातक पदार्थ खाल्ल्याने आपल्या रक्तात काही असे तत्व पोहचतात जे की शरीराला नुकसान पोहचवतात. त्यालाच रक्त अशुद्ध होणे म्हणतात. रक्त अशुद्ध झाल्याने चेहऱ्यांवर पिंपल्स येतात. आणि त्वचारोग देखील होऊ शकतात. लवकर थकवा जाणवणे, वजन कमी होणे, पोटांचे विकार आदी,समस्या देखील रक्तच्या अशुद्धतेमुळेच होतात.त्यासाठी आपले रक्त शुद्ध असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्थपानाने काम करीत राहील.आणि आपल्या चेहऱ्यावरील तेज कायम राहील रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला वेगळा खर्च करून काही अधिक उपचार घेण्याची गरज नाही. तर फक्त छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या काळजीपूर्वक पाळायच्या आहेत.


  आपल्या शरीरातील किडनी आणि लिव्हर घातक पदार्थांना बाहेर सोडून शरीरातील रक्ताला शुद्ध करत असते.

  - कसे ठेवता येईल रक्त शुद्ध .....


  > पाणी: किडनीच्या सुस्थितीसाठी व तिच्या नियमित क्रियेला सुरळीत ठेवण्यासाठी आपण पुरेपूर पाणी प्यावे. किडनी पाण्याच्या साहाय्याने आपल्या शरीरास उपयुक्त नसलेले पदार्थ साफ करीत असते. पाण्याने रक्त पेशी देखील खुल्या होन्यास मदत होते. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेला वेग येतो पाणी कमी पिल्याने किडनी संदर्भातील आजार उद्भवतात साधारणतः प्र्यत्येक व्यक्तीने किमान ८ ग्लास पाणी एका दिवसात पिणे आवश्यक आहे. जेणेकरुन किडनीचे कार्य सुरळीत चालेल आणि आपले रक्त देखील शुद्ध होत राहील.


  > ब्लूबेरी : ब्लूबेरी खाल्ल्याने लिव्हर चांगले राहते. प्राण्यांविषयी केलेल्या चिकित्सक अभ्यासातून हे समोर आले आहे की, लिव्हर साठी हे खूप फायदेशीर आहे.


  > क्रॅनबेरी : क्रॅनबेरी आपल्या शरीरातील युरिन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी ओळखले जाते. ते युरिनचे बॅक्टेरियापासून संरक्षण करते. त्याने किडनीला संसर्गापासून धोका नसतो. त्यामुळे क्रॅनबेरी देखील आपन खाल्ली पाहिजे.


  > कॉफी: कॉफी देखील शरीरास फायदेशीर मानली जाते कॉफी पिल्याने शरीराला सिरोसिसचा चा धोका नसतो आणि कॉफी लिव्हर ला होणाऱ्या कॅन्सर देखील वाचवते.

  > लसूण: लासनाने पदार्थांना विशिष्ट चव तर येतेच सोबतच त्यात अँटी इन्फ्लॅमरेटरी प्रॉपर्टी असते ज्याने कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढत नाही. आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रिया नियंत्रित राहते.

  > ग्रेपफ्रूट:
  ग्रेपफ्रूट मध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. ते शरीरातील इंफ्लेमेशन नियंत्रित ठेवतात. ते खाण्याने लिव्हरला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. त्याने दारु पासून होणाऱ्या घातक परिणामांचा प्रभाव देखील कमी होतो.

  > सफरचंद: सफरचंद मध्ये पेक्टिन नामक फायबर जास्त प्रमाणात शरीरास मिळते. ते शरीरातील साखरेचे प्रमाण त्याचबरोबर रक्ताचे प्रमाण देखील नियंत्रित ठेवते. न्याहारीमध्ये त्याचा वापर केल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

  > मासे: सालमन, टुना या माश्यांच्या प्रकारात ओमेगा ३ फॅटी ऍसिड अधिक प्रमाणात असते. त्याने रक्तातील ट्रायग्लिसराईडची लेव्हल कमी होते. आणि रक्ताभिसरणावरील दाब कमी होतो.

Trending