Home | Business | Business Special | how to deal with personal loan offer

तुम्हालाही पर्सनल लोनसाठी ऑफर आली असेल तर प्रोसेसिंग फी आणि व्याज दरात मागू शकता सूट, अशाप्रकारे करा चौकशी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:15 AM IST

बँकला विचारा ऑफरची पूर्ण माहिती, मिळवा लाभ

 • how to deal with personal loan offer


  नवी दिल्‍ली : तुम्हाला जर बँक किंवा इतर फायनांशिअल इंस्‍टीट्यूशनकडून पर्सनल लोनसाठी ऑफर आली असेल तर तुम्ही या ऑफरचा योग्ग प्रकारे वापर करू शकता. तुम्हाल व्यक्तीगत कर्जाची आवश्यकता आहे आणि तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर चांगला आहे तर अशावेळी तुम्ही बँकेच्या प्रोसेसिंग फीस व्याजावर मोलभाव करून सूट घेऊ शकता. साधारणतः बँक चांगला क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांची प्रोसेसिंग फी माफ करण्यासोबतच व्याज देखील कमी करतात. बँकेतून पर्सनल लोनसाठी फोन आल्यानंतर त्यासाठी तत्काळ होकार देऊ नका. अशावेळी बँकेतून त्या ऑफरची पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढील पाऊल उचलणे फायदेशीर ठरते.

  ऑफरमध्ये प्रोसेसिंग फी माफ आहे की नाही याबाबत बँकेत विचारणा करा
  तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोनसाठी ऑफर आल्यावर ती ऑफर कोणत्या प्रकारची आहे, या ऑफरसाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागणार की नाही याबाबत विचारपूस करावी. यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, फोटो आणि अॅड्रेस प्रुफ सारखे कागदपत्रांची गरज आहे का नाही याबाबत विचारावे. साधातरणः पर्सनल लोनची ऑफर दोन प्रकारची असते. एका ऑफरमध्ये तुम्हाला प्रोसेसिंग फी देण्याची आवश्यकता असते. याशिवाय तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्रांची कॉपी द्यावी लागते.

  व्याज देण्याविषयी करा विचारणा
  पर्सनल लोन ऑफर आल्यानंतर त्यावर किती व्याज द्यावे लागणार याबाबत विचारणा करणे आवश्यक आहे. साधातरणः बँक 12 ते 36 टक्के इंटरेस्‍ट रेटवर पर्सनल लोन देत असते. हा इंटरेस्‍ट रेट तुमची सॅलरी किंवा इनकम आणि कंपनी प्रोफाइलवर निर्भर असतो. याशिवाय तुमची क्रेडिट हिस्‍ट्री आणि क्रेडिट स्कोर चांगला असेल तर बँक तुम्हाला कमी व्याज दरावर गृह कर्ज देऊ शकते.

Trending