social / भुकेला आणि भ्रष्ट पाक भारताशी लढणार कसा? 

इम्रान खान यांनी 'न्यूयाॅर्क टाइम्स'मधील लेखाद्वारे भारताला युद्धाची धमकी दिली आहे, पण नेपोलियनने म्हटले होते : लष्कर भुकेल्यापोटी युद्ध करत नाही. 

Sep 01,2019 08:25:00 AM IST

काश्मीरमध्ये जेव्हापासून कलम ३७० मध्ये बदल करण्यात आला आहे तेव्हापासून पाकिस्तानने भारताला किमान १० वेळा युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटले आहे की, जर काश्मीरप्रकरणी जगातील नेत्यांची चुप्पी कायम राहिली तर संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पाकिस्तान किती दिवस भारताशी युद्ध करू शकतो? आणि भुकेल्यापोटी पाकिस्तान आपल्याशी लढणार कसा? असे प्रश्न आहेत.

चार आघाड्यांवर पाकिस्तान हवालदिल
कर्ज : ४० लाख कोटी
उधारीवर चालतोय पाकिस्तान
स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननुसार, पाकिस्तानवर २०१९ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ४०,२१४ अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (म्हणजे ४० लाख कोटी) कर्ज आहे. ते जीडीपाच्या १०४% आहे. इम्रान यांनी सत्ता सांभाळल्यानंतर पहिल्या आठ महिन्यांतच सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि चीनकडून ९ अब्ज अमेरिकी डाॅलरचे कर्ज देश चालवण्यासाठी घेतले आहे.

महागाई दर : १०.३%
१ डाॅलर : १५७ पाकिस्तानी रुपये
पाकिस्तानच्या सांख्यिकी कार्यालयानुसार येथे जुलै महिन्यात महागाई दर १०.३ टक्क्यांवर गेला. एक महिन्याआधी तो ८.९ टक्के होता. गेल्या वर्षी जुलैत हा आकडा ५.८ टक्के होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत गॅसचे दर १४३% आणि पेट्रोलचे दर २३% वाढले आहेत. २०१३ नंतर पहिल्यांदा महागाई दर दोन आकड्यांत गेला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.

खाद्य सुरक्षा : ६०% घरांत भुकेची भीती
२०.५% लोकसंख्या कुपोषित
पाकिस्तानच्या नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेनुसार ६०% घरात फूड इनसेक्युरिटी आहे. पाकिस्तानच्या २०.७ कोटी लोकसंख्येत २०.५% लोकसंख्या कुपोषित आहे. पाच वर्षांखालील ४४% मुले कुपोषित आहेत. पाकिस्तानमध्ये बहुतांश बजेट भुकेशी लढण्याएेवजी संरक्षणावर खर्च केले जात आहे.

भ्रष्टाचार : ११७ वी रँक
१३ मोठे नेते तुरुंगात आहेत|ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स २०१८ मध्ये पाकिस्तानची १८० देशांत ११७ वी रँक होती. पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार मोठ्या नेत्यांपासून लहान विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत व्याप्त आहे. या वेळी पाकिस्तानमध्ये विरोधी पक्षांचे १३ मोठे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात आहेत. त्यात तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम, माजी राष्ट्रपती अासिफ अली झरदारी या नेत्यांचा समावेश आहे.

भाज्यांच्या किमती भिडल्या गगनाला
फुलकोबी - 180
पानकोबी - 170
गाजर - 140
ब्रोकोली - 1600
हिरवा मटर - 360
कांदा - 100
टॉमॅटो - 200
भेंडी - 180
कारले - 120

दर - पाकिस्तानी रुपयात. दर पाकिस्तानी वेबसाइट CARTPK.COM नुसार.
-स्रोत : पाकची वेबसाइट कार्टपीके.काॅमनुसार ३१ ऑगस्टचा दर.

X