Home | Business | Business Special | how to get passport in 7 days

आता पासपोर्ट तयार करण्याची प्रोसेस झाली अगदी सोपी, फक्त 7 दिवसांत प्राप्त करू शकतात पासपोर्ट; ऑनलाइन आहे संपूर्ण प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 02:11 PM IST

आठवडाभरात पासपोर्ट पाहिजे असल्यास या 4 कागदपत्र्यांची आहे आवश्यकता

 • how to get passport in 7 days

  यूटिलिटी डेस्क - पासपोर्ट तयार करण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे. तुम्ही 4 कागदपत्रे जमा करून फक्त 7 दिवसांत पासपोर्ट मिळवू शकता. या प्रोसेसमध्ये पासपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पोलिस चौकशी होते. यामुले पासपोर्टच्या अगोदर पोलिस चौकशीसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे.

  या चार कागपत्रांची आहे आवश्यकता

  7 दिवसांत पासपोर्ट हवा असल्यास तुमच्याकडे आधार कार्ड, निवणूक ओळख पत्र, पॅन कार्ड आणि कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसलेले एक अॅफिडेव्हिट असणे गरजेचे आहे. हे कागदपत्रे असल्यास तुम्हाला सात दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो. यासाठी तुम्हाला तत्काळचा पर्याय निवडावा लागेल. साधारण प्रक्रियेने पासपोर्ट तयार करण्यासाठी 1500 रूपये खर्च येतो पण यामध्ये तुम्हाला 2 हजार रूपये शिल्लक द्यावे लागणार आहे. तुम्हाला एकूण 3500 रूपये फी द्यावी लागेल.

  अशी हे संपूर्ण प्रोसेस

  > Passport Seva Kendra (PSK) ची वेबसाइट www.passportindia.gov.in वर जा.

  > तुम्ही जर नवीन युझर असाल तर सर्वांत पहिले स्वतःचे अकाउंट तयार करा. यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावयाची आहे.


  > यानंतर सर्व कागदपत्र्यांची स्कॅन्ड कॉपी अपलोक करा. यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचा ऑप्शन मिळेल.

  > पेमेंट झाल्यानंतर तुम्ही जवळील पासपोर्ट सेवा केंद्रावर अपॉइंमेंट घेऊ शकता.

  > अपॉइंमेंट रिसिप्टची प्रिंटआउंट काढून घ्या. हे प्रिंटआउंट तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रावर सोबत घेऊन जावी लागणार आहे.

  > येथे तुमच्या कागदपत्र्यांची पडताळणी करण्यात येईल. यानंतर आठवडाभरात तुम्हाला पासपोर्ट मिळेल.

Trending