आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या PF अकाउंटचा UAN नंबर मिळवण्याची सोपी पद्धत, 5 STEPS मध्ये करा Active

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - ईपीएफओने प्रोव्हिडेंट फंड(PF) खातेधारकांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ची सुविधा दिली आहे. अजुन असे अनेक खाते धारक आहेत ज्यांना त्यांचा यूएएन नंबर मिळाला नाही किंवा ज्यांना मिळाला आहे त्यांनी तो अॅक्टीव्हेट केलेला नाही. यात काहींनी आपला नंबर अॅक्टीव्हेट होत नाही असेही म्हटले आहे. याचे कारण यूएएन नंबर बद्दलच्या माहितीचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे.

 

काय आहे यूएएन नंबर ?
युनिव्हर्सल अकाउंट नंबर(UAN) मुळे आता लोकांना त्यांचे पीएफ खाते बंद करणे किंवा ट्रान्सफर करणे सोपे जाणार आहे. अनेकवेळा नोकरी सोडल्यावर किंवा कंपनी बदलल्यावर पीएफ खाते बंद केले जाते किंवा नवीन उघडले जाते. यात खुप वेळ जातो आणि खातेधारकाला नुकसान होते. त्यामुळे यूएएनच्या मदतीने तुम्ही तुमच्या अकाउंटचे बँलेंस कुठूनही चेक करू शकता, त्यासोबतच पासबूक आणि यूएएन कार्डही डाउनलोड करू शकता. पण अनेक लोकांना यूएएन काय आहे हेच माहीत नाहीये. 

 

UAN स्टेटस माहित करून घ्या
आपले UAN स्टेटस माहीत करून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक http://uanmembers.epfoservices.in/check_uan_status.php करा. त्यानंतर विंडोवर  पेज ओपन होईल त्यात सर्व माहीती भरा. त्यात राज्यचे नाव, सिटी, इस्टॅबलिशमेंट कोड आणि पीएफ अकाउंट नंबर भरून चेक स्टेटस बटनवर क्लिक करा.


कसे कराल अॅक्टिव्हेट

 

STEP 1-
कंपनीतून यूएएन महीत झाल्यानंतर त्याला अॅक्टिवेट करावा लागेल. याला अॅक्टिवेट करण्याठी http://uanmembers.epfoservices.in/index.php?

accesscheck=%2Fhome.php या लिंकवर क्लिक करा. ओपन झालेल्या पेजवर activate your UAN वर क्लिक करा.

 

STEP 2-
लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात यूएएन नंबर, मोबाइल नंबर, राज्य, सिटी, इस्टॅबलिशमेंट आणि पीएफ अकाउंट नंबर भरावा लागेल. सगळी माहीती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड भरून ‘GET PIN’ वर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर 5 मिनीटात तुमच्या मोबाइल फोन वर एक पिन येईल, त्याला फॉर्ममध्ये भरून सबमिट करा.

 

ई-मेलवर मिळेल अॅक्टिव्हेशन लिंक

 

STEP 3-
पिन सबमिट केल्यावर जी विंडो ओपन होईल, त्यात तुमचे नाव, वडिलांचे नाव, कंपनीचे नाव, यूएएन आणि जन्मतारीख दिसेल. त्यात तुम्हाला तुमच्या यूएएन अकाउंटमध्ये लॉगिन करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुमची ई-मेल आयडी रजिस्टर करून सबमिट केल्यावर तुम्हाल एक ई-मेल येईल, त्यात अॅक्टिव्हेशन लिंक असते.

 

कसे लॉगिन कराल आपल्या अकाउंट मध्ये

 

STEP 4- 
आपला यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी http://uanmembers.epfoservices.in/ या लिंकवर क्लिक करा. तुमचे  यूएएन आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन बटनवर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या विंडोवर एक पेज ओपन होईल, जे तुमच्या अकाउंटचे पेज असेल.

 

डाउनलोड करा पासबुक

 

STEP 5-
तुमच्या अकांउटमध्ये आल्यानंतर यूएएन कार्ड आणि पासबुक डाउनलोड करू शकता. पासबुकच्या मदतिने तुम्ही पाहू शकता तुमच्या पीएफ अकांउटमध्ये किती बॅलेंस आहे. त्यासोबतच मेंबर आयडी आणि इस्टॅबलिशमेंट कोडही दिसेल. 

 

ट्रान्सफर क्लेम

ईपीएफला या वेबसाइटवरून क्लेम सुद्धा ट्रान्सफर केले जाऊ शकते. तुम्हालाही ऑनलाइन ट्रान्सफर करायचे असेल तर वर दिलेल्या वेबसाइटवरून करता येईल. 

बातम्या आणखी आहेत...