Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel

कार-बसमध्‍ये प्रवास करताना उल्‍टी येते? आजमवून पाहा या 5 Tips; लगेच मिळेल आराम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:09 AM IST

प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो.

 • How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel

  युटिलिटी डेस्क - प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो. मोशन सिकनेस हा कोणताही आजार नसून एक अशी स्थिती आहे जेव्‍हा प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात ज्‍यामुळे नव्‍हर्स सिस्‍टीमचा गोंधळ उडतो. या कारणांमुळे चक्‍कर येते व मळमळ होते. मात्र काही घरगुती उपाय केल्‍यास यापासून आराम मिळू शकतो.


  1) अद्रक
  प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने मोशन सिकनेसमुळे होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.

  2) अॅप्पल साइडर व्हिनेगार
  अॅप्‍पल साइडर व्हिनेगारमुळे शरीरातील क्षार व पीएच संतुलनावर प्रभाव पडतो. मोशन सिकनेस होत असल्‍यास एक कप कोमट पाण्‍यामध्‍ये एक चमचा अॅप्‍पल साइडर व्हिनेगार आणि एक चमचा मध मिसळून प्‍या. यामुळे आराम मिळेल.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर उपायांविषयी...

 • How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel

  3) पुदिना
  पुदिन्‍यामुळे मोशन सिकनेसच्‍या समस्‍येपासून ताबडतोब आराम मिळतो. पुदिन्‍यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्‍या समस्‍येला दूर करण्‍यासही पुदिना मदत करतो.

 • How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel

  4) लिंबू
  ताजे लिंबू किंवा लिंबाच्‍या रसामध्‍ये सा‍यट्रिक अॅसिड असते. यामुळे प्रवासादरम्‍यान होणारी उल्‍टी, मोशन सिकनेस आणि पोटासंबंधीचा त्रास कमी होतो. एवढेच नव्‍हे तर लिंबाचा केवळ वास घेतल्‍यानेही या मोशन सिकनेसपासून आराम मिळतो.

 • How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel

  5) खारे क्रॅकर्स
  खारे क्रॅकर्स हा एक सहज पचणारा नाष्‍टा आहे. पोटासाठीदेखील हे अतिशय चांगले असते. हे चवदार खाद्यपदार्थ पोटातील अतिरिक्‍त अॅसिड शोषून घेतात. यामुळे मोशन सिकनेसपासून आराम मिळतो.

Trending