Home | Business | Gadget | How To Identify Fake And Real Mobile Accessories

इंडियन मार्केटमध्ये मिळतात अॅपलसह अनेक प्रोडक्टच्या फेक अॅक्सेसरीज, असली-नकली ओळखण्यासाठी फॉलों करा स्टेप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:00 AM IST

तुम्ही महागडा स्मार्टफोन किंवा गॅझेट खरेदी करत असाल आणि ते फेक मॉडेल असेल तर नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  गॅझेट डेस्क - भारतात स्मार्टफोन आणि अॅक्सेसिरीजचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी फेक गॅझेट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेक. ते पाहिल्यानंतर नकली असल्याचा अंदाजही येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही महागडा स्मार्टफोन किंवा गॅझेट खरेदी करत असाल आणि ते फेक मॉडेल असेल तर नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. त्यामुळे असली आणि नकलीतील फरत तुम्हाला माहिती हवा.


  फेक अॅक्सेसरीज
  फेक प्रोडक्ट हे दिसायला अगदी हुबेहूब ओरिजनल सारखेच असतात. त्यासाठी खास काळजी घेतली जाते. त्यासाठी बॉडी, कलर, लोगो प्रत्येकीवर परिश्रम घेतले जातात. म्हणजे ते पाहून तुम्हाला याचा अंदाजच येत नाही की ते खरे आहे की डुप्लिकेट. पण त्याचा वापर केला असता सर्वकाही समोर येते.


  सॅमसंग चार्जर
  सॅमसंगचे फेक चार्जरही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशा फेक चार्जरमुळे फोन खराब होण्याची शक्यता असते. वरील फोटोमध्ये आम्ही रेड कलरने मार्क केले आहे. फेक चार्जरमधील टेक्स्ट वेगळे आहे. त्यात अॅडिशनल A+ लिहिलेले आहे. तसेच फेक चार्जरवर मेड इन चायना लिहिले आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही फेक अॅक्सेसरीज खरेदी करण्यापासून वाचू शकता.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, Apple, सॅमसंग, पॅनासॉनिक, HTC, बीट्स अशा कंपन्यांच्या फेक अॅक्सेसिरीजबाबत..

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  मायक्रो USB पोर्ट
  स्मार्टफोन वापरताना प्रत्येकाला USB केबलची गरज पडतेच. अनेकदा एकमेकांची केबल घेऊनही डेटा ट्रान्सफर केला जातो. पण तुम्ही USB केबल घेत असाल तर ती ओरिजनल आहे का हे चेक करा कारण त्यामुळे फोन खराब होऊ शकतो. वर दाखवलेल्या फोटोत फेक केबलचे USB कनेक्टर जास्त लांब आहे. तसेच लोगोचा कलर अधिक डार्क आहे. 


   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  USB पोर्ट
  मायक्रो पोर्टप्रमाणेच USB पोर्टही चेक करणे गरजेचे असते. त्याचे कारण म्हणजे अनेकदा या पोर्टला कॉम्प्युटर, लॅपटॉप, चार्जरमध्ये वापरले जाते. वरील फोटोप्रमाणे फेक पोर्टवर एखादा नंबर किंवा इतर काही लिहिलेले असू शकते. तसेच केबलवर प्रिंट असलेला USB लोगोचा रंगही वेगळा असू शकतो. काळजीपूर्वक ते पाहायला हवे. 


   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  सॅमसंग चार्जरवरील टेक्स्ट 
  फेक सॅमसंग चार्जर हुबेहूब ओरिजनलसारखे आहे. पण त्यावर लिहिलेल्या ब्रँडनेमचा फॉन्ट वेगळा आहे. फेक चार्जरच्या अक्षरांची जाडी जास्त आहे. A अक्षराकडे लक्ष देऊन पाहिले की, ते लक्षात येते. 

   
   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  चार्जरचा USB पोर्ट
  फोटोत पाहून अंदाज लावता येईल की सॅमसंग चार्जरच्या रियल आणि फेक USB पोर्ट मध्ये किती फरक आहे. दोन्हीचे डिझाइन पूर्ण वेगळे आहे. वेगवेगळे पाहिले तर ते ओळखू येत नाही. पण एकाचवेळी यातील फरक स्पष्ट दिसतो. आतील फिमेल कनेक्टरही वेगळे आहे. 

   
   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  सॅमसंग चार्जर पिन
  सॅमसंगच्या फेक चार्जरची पिनही वेगळी आहे. ओरिजनल चार्जरच्या पिनला खालच्या बाजुने एक छोटी लेयर असते. फेकमध्ये असे नसते. याची डिझाइन पाहून कोणीही याला फेक चार्जर म्हणू शकत नाही. 

   
   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  अॅपल ईअरपॉड
  मार्केटमध्ये अॅपलच्या फेक आयफोनसह फेक अॅक्सेसरीजही आहेत. जर तुम्हाला ईअरपॉड घ्यायचा असेल तर काळजीपूर्वक तपासून घ्या. दिसायला अगदी सारखा असलेला हा आयपॉड साऊंड क्वालिटीचा विचार करता फारच कामचलाऊ असतो. व्हॉल्यूम कीच्या मध्ये असलेल्या गॅपवरून तो ओळखता येतो. फेक ईअरपॉडमध्ये गॅप ब्लॅक किंवा स्लेटी कलरचा असू शकतो. तर ओरिजनल मध्ये तो व्हाइट असतो. तसेच लोगोही पाहा. पण खरी ओळख साऊंड क्वालिटीवरूनच होते. 


   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  ईअरपॉड जॅक
  ओरिजनल ईअरपॉडमध्ये जो 3.5mm जॅक असतो तो लाइट गोल्डन कलरचा असतो. तसेच याच्यामध्ये व्हाइट कलरच्या रिंग्स असतात दुसरीकडे फेक ईअरपॉडमध्ये या रिंग्स ब्लॅक कलरच्या आहेत. एवढेच नाही तर जॅकमधील मेटल सिलव्हर कलरचे आहे, ते ओरिजनलपेक्षा वेगळे आहे. 


   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  पॅनासॉनिक चार्जर
  दोन्हींचे डिझाइन सेम असते, पण त्यावरील टेक्स्टवरून ओळखता येते. ओरिजनलमध्ये C लिहिलेले आहे, त्याद्वारे CSचे अप्रुव्हल दिसते. तसेच दोन्हीच्या सिरियल नंबरचा फॉरमॅटही वेगळा आहे. तसेच रियल चार्जरच्या मध्यभागी ओपन पॅच आहे. 


   

 • How To Identify Fake And Real Mobile Accessories

  बीट्स हेडफोन
  फेक अॅक्सेसरीजमध्ये बीट्स कंपनीच्या हेडफोनचा समावेशही आहे. वर दाखवलेल्या फोटोमध्ये लाल मार्कने फरक दाखवला आहे. पण सर्वात मोठा फरक साऊंज क्वालिटीचा आहे. त्यावरून लगेचच फरक जाणवतो. 

Trending