आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रति लिटर 6 किमी पर्यंत वाढेल आपल्या आवडत्या कारचे मायलेज, करावा लागेल फक्त एवढाच बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - नवीन मारुती अर्टिगा MPV 7.44 लाख रुपये किमतीसह भारतात लॉन्‍च झाली आहे. आता कंपनीने या गाडीचे पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल ऑटो आणि डिझेल मॅन्युअल व्हेरिअंट आणले आहेत. सध्या अर्टिगासाठी 4 आठवड्यापासून बुकिंग सुरू आहे. या गाडीचा फॅक्ट्री फिटेड CNG व्हेरिअंट मार्च 2019 पर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. पण आपल्याकडे एक उत्तम पर्याय आहे. आपण जर अर्टिगा CNG खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.  

 

> एका मिडीया रिपोर्टनुसार मारुतीचे अधिकृत डीलरकडून नवीन अर्टिगामध्ये CNG किटची ऑफर देण्यात येत आहे. मात्र 55 हजार रूपयांमध्ये ते उपलब्‍ध आहे. यामध्ये किटची किंमत, फिटिंग होईल. त्यावर एका वर्षाची वारंटी देखील मिळत आहे. मायलेजच्या बाबतीत सांगितले जात आहे की, एक किलो CNG मध्ये 25 किमीचे मायलज देईल. डीलर कोणत्याही पेट्रोल व्हेरिअंटमध्ये CNG किट फिट करू शकतात. पण याचा खर्च कारच्या किमतीपेक्षा वेगळा असणार आहे. 

 

किती असेल पेट्रोल इंजिनचे मायलेज
> एक लिटर डिझेलमध्ये 25.47 किमी मायलेज देईल. तर पेट्रोल व्हेरिअंटमध्ये मॅन्युअल व्हेरिअंटचे मायलेच 19.34 किमी/लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंट 18.69 किमी/लिटर मायलेज देण्याचा कंपनी करत आहे. 

 

काय आहेत फीचर्स 
> सेकंट जनरेशन अर्टिगामध्ये डुअल एअरबॅग. टचस्‍क्रीन इन्‍फोटेनमेंट, ABS आणि EBD देण्यात आले आहे. याचा इन्‍फोटेनमेंट सिस्टम अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्ट आहे. रशलेनच्या माहितीनुसार यामध्ये थ्री स्पोक मल्‍टीफंक्‍शनल स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. सोबतच बीज आणि ब्लॅक कलरसोबत फॅब्रिक अपहोल्‍स्‍ट्री दिली आहे. नवीन Ertiga मध्ये पुश बटन स्‍टार्ट/स्‍टॉप सारख्या फीचर व्यतिरिक्त ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सुविधा दिली आहे. अगोदरच्या Ertiga च्या तुलनेत नवीन Ertiga चे ग्रिल मोठे आहे. यामध्ये हेडलँप क्लस्टर सोबत प्रोजेक्‍टर लाइट आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. 

 

इंजिन किती ताकदवर असणार

> नवीन Ertiga मध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सध्या विक्री होत असलेल्या Ertiga मध्ये 1.4 लिटरचे पेट्रोल इंजिन दिलेले आहे. नवीन पेट्रोल इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्‍वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायामध्ये येत मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...