शेअर बाजारामार्फत कमाई / शेअर बाजारामार्फत कमाई करण्यासाठी वापरा या 8 टीप्स, छोट्या रकमेपासून होते लाखोंची कमाई

Dec 29,2018 10:54:00 AM IST


नवी दिल्ली : पैसे कमविण्यासाठी मोठ्या रकमेपासून सुरुवात करणे गरजेचे नाही. तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करून श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केट (Stock Market)चे काही बेसिक नियम लक्षात घ्यावे लागतील. अनेक मोठे गुंतवणूकदार या नियमांचे पालन करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. आज श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. तुम्हाला पण शेअर बाजारातून (Share Bazaar) कमाई करायची असेल तर तुम्हाला हे आठ गोल्डन टीप्सवर लक्ष द्यायला हवे. याद्वारे तुमची छोटी रक्कम लाखो किंवा कोटीमध्ये बदलू शकते.


टॉप इन्व्हेस्टर्सने सुद्धा फॉलो केले हे मंत्र

वॉरेन बफेट, राकेश झुनझुनवाला आणि आर के दमानी यासांरख्या टॉपच्या गुंतवणूकदारांनी या 8 मंत्र अवलंबले आहेत

या फॉर्म्युलामुळे या दिग्गजांनी रक्कम त्यांनी गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक पटीने वाढली आहे.

राकेश झुनझुनवाला आणि आर के दमानी यांचा भारतातील टॉप श्रीमंतांमध्ये समावेश आहे तर वॉरेन बफेट हे जगातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहेत.

1. पहिला मंत्र : वेळेची वाट पाहू नका

- वॉरेन बफेट यांचे म्हणणे आहे की, मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येक वेळ योग्य असते. यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक वाजवी किंमतीवर असेल तर त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात करायला हवी. त्यावेळी बाजारात दबाव दिसत असला तरी ही गुंतवणूक करावी.

- एक सामान्य गुंतवणूकदार योग्य वेळेची वाट पाहत बसल्यास बाजारात गुंतवणूक करू शकत नाही. त्याच वेळी, जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा तो बाजाराची हालचाल पाहून उच्च पातळीवर स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो आणि नुकसान करून घेतो.

पुढे वाचा....इतर टीप्सबद्दल...

2. दुसऱ्यांकडे पाहून पैसे गुंतवू नका - इतर लोक एखाद्या स्टॉकमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत म्हणून तुम्ही तेथे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. लोकांचे अनुकरण न करणे हा स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्याचा यशस्वी मंत्र आहे. लोकांनी तुमचे अनुकरण करायला हवे, तुम्ही लोकांचे नाही. - वॉरेन बफेट (Warren Buffett) सांगतात की, जेव्हा इतर लोक लोभामध्ये येत असतील तेव्हा तुम्ही सावध व्हा. त्याचवेळी दुसरे लोक सतर्क होत असतील तर ते पैसे कमविण्याचा विचार करत आहेत. 3. किमतीवर जाऊ नका, मूल्य पाहा कोणत्याही शेअरवर पैसे गुंतवणूक करताना त्याची किंमती जास्त आहे तर आपल्याला फायदा होईल याकडे पाहू नका. अनेकवेळा 50 ते 100 किंमत असणारे शेअर मूल्यवान ठरू शकतात. जर कंपन्यांचे प्रदर्शन चांगले असेल. स्टॉक मार्केटमधील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे म्हणणे आहे की, कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे प्रदर्शन पाहा. कंपनीचे प्रदर्शन चांगले असेल तर मार्केटमधील चढ-उतारामुळे अडचण येणार नाही. पुढे वाचा.... इतर टीप्सबद्दल4. लाभ देणाऱ्या कंपन्यावर विश्वास ठेवा फॉर्च्युन फिस्कलचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांनी सांगितले की, गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्या लाभ देत आहेत की नाही याकडे लक्ष द्या. एखादी कंपनी नियमितपणे लाभ देत असेल तर त्या कंपनीकडे पैशांची कमतरता नाही. रोख अधिशेष असलेल्या कंपन्यांचे कार्यप्रदर्शन देखील चांगले असते. अशातच या कंपन्यांच्या शेअरसोबत तुमचा पैसा वेगाने वाढण्याची शक्यता असते. 5. कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांची निवड करा गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या कंपनीवर किती कर्ज आहे हे तपासून घ्या. कर्ज कमी असल्यामुळे कंपन्यांवर पैशाबाबत दबाव राहत नाही. टीसीएस (TCS)आणि इन्फोसिस (Infosys) अशा कंपन्यांचे उदाहण आहेत. पुढे वाचा.... इतर टीप्सबद्दल6. एकाचवेळी पूर्ण रक्कम गुंतवू नका स्टॉकमध्ये नेहमीच चढ-उतार पाहायला मिळतो. अशात नफा मिळविण्याचा तिसरा नियम आहे की, एकाचवेळी पूर्ण रक्कम गुंतवू नये. एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एकूण रक्कम वाटून घ्या आणि हळूहळू खरेदी करा. स्टॉकमध्ये घसरण झाली तरी खरेदी चालू ठेवून खरेदीची सरासरी कमी करू शकता. यासाठी सुरूवातीपासून योजना तयार करा आणि गुंतवणूक करा. 7. ध्येयाबद्दल अधिक व्यवहारी राहा मार्केटमध्ये 100 पटीने रिटर्न देणाऱ्या स्टॉक्सची कमतरता नाही. मजबूत स्टॉक्समध्ये स्थिर वाढ पाहण्यास मिळते. अशातच मार्केटमधील सुरक्षित गुंतवणूक समजले जाणारे स्टॉक्समध्ये कमी कालावधीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमी असते. पण दीर्घकालावधीत हे स्टॉक्स तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. पुढे वाचा.... इतर टीप्सबद्दल8. अफवांवर लक्ष देऊ नका वॉरेन बफेटच्या मते, स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दरवेळी त्याच्या किमती पाहणे एक चुकीची रणनिती आहे. त्याला काही काळासाठी सोडून द्यायला हवे. स्टॉक मार्केटमध्ये अफवा मोठ्या प्रमाणात पसरतात. अशा अफवांवर लक्ष देऊ नये. जास्त परताव्याच्या आमिष ठेऊ नये. तुम्हाला जर 15 ते 20 टक्के परतावा दिसत असेल तर गुंतवणूक करावी.
X