आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केटमध्ये नेमकी कशी करता येते गुंतवणूक, जाणून घ्या डी-मॅट अकाउंट काढण्यापासून रिटर्न्सपर्यंत सर्वच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवसेंदिवस लोकांमध्ये शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेअर बाजारात चांगले रिटर्नस् मिळण्याची शक्यता जास्त असल्यामुळे लोकांनी  गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. परंतु त्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या योग्य पद्धती माहित नसल्याने अजुनही बहुसंख्य लोक गुंतवणुकीसाठी घाबरतात. याबद्दल चांगल्याप्रकारे जाणून घेतले तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर आणि सुरक्षित आहे. जर गुंतवणुकदार निश्चित वेळेनंतर त्याचे शेअर विकत असेल तर तो शेअर पूर्णपणे टॅक्स फ्री होतो. हा फायदा लाँग टर्म कॅपिटल गेनअंतर्गत मिळतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे इतरही खूप फायदे आहेत.

 

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

> शेअर बाजारात खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आवश्यक असते. ही कागदपत्रे आणि खाते उघडण्यापुर्वीचा फॉर्म भरल्यानंतर गुंतवणूकदाराचे खाते अॅक्टीवेट होऊन जाते.

> शेअरखानचे व्हाईस प्रेसिडेंट मृदुल कुमार वर्मा यांनी सांगतात की, 'लोकांकडे त्यांचे डीमॅट अकाउंट असणे त्यांच्या फायद्याचे ठरते. या अकाउंटमुळे शेअर आणि म्युचुअल फंडशिवाय टॅक्स सेव्हींग बॉन्डपासून कंपनीच्या एफडीपर्यंतची खरेदी केली जाउ शकते.

> अचानक पैशांची गरज भासली तर डीमॅट अकाउंटमधील शेअर, म्युचुअल फंड, बॉन्ड किंवा कंपनीच्या एफडीच्या बदल्यात कर्ज मिळते. हे शेअर ऑनलाइन पद्धतीने तारण ठेवण्याची सुविधा असते.'

 
पुढील स्लाइडवर वाचा- शेअर बाजारात गुंतवणूक करुन कशाप्रकारे फायदा घेता येउ शकतो

बातम्या आणखी आहेत...