नेहमीच ट्रॅक होत / नेहमीच ट्रॅक होत असतो तुमच्या स्मार्टफोनचा डेटा, असे सुरक्षित ठेवा WhatsApp सह इतर मेसेज

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2018 12:02:00 AM IST

गॅजेट डेस्क - स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप डाऊनलोड कराल तर आपल्या स्मार्टफोनचा संपूर्ण अॅक्सेस एकंदरीत ताबाच मागितला जातो. यात मोबाईल डेटा आणि काही मोजक्या परवानग्या ठीक आहेत. परंतु, आजकाल अॅप्स आपल्या मोबाईलचा कॅमेरा, माइक, लोकेशन आणि फोन बुकसह फोटो अल्बम सुद्धा पाहू शकतात. यातील बहुतेक अॅप्स बंद केल्यानंतरही बॅकग्राउंडमध्ये सुरूच असतात. हे अॅप्स मोबाईल डेटा आणि बॅटरी तर खातातच परंतु, त्यातून प्रायव्हेट डेटा लीक होण्याचीही भीती असते. त्यामुळे, आपला व्हॉट्सअॅप आणि इतर डेटा सुरक्षित ठेवण्यासह फालतूच्या जाहिरातींपासून वाचण्याचा फंडा आज आम्ही आपल्याला सांगत आहोत.


पुढील स्लाइडवर जाणून घ्या... कशी करायची सेटिंग....

1. सुरुवातीला क्रोम ब्राऊझरला ओपन करा. वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन Privacy वर टॅप करा. येथे Do Not Track वर टॅप करुन त्याला ऑन करा. यानंतर तुमचा डाटा कोणीही ट्रॅक करु शकणार नाही. 2. गुगल क्रोमवर आपण जे काही सर्च करतो त्यावर पुर्ण नजर ठेवली जाते. त्या हिशोबानेच आपल्याला जाहिराती पाठवल्या जातात.कुणीही वाचू शकणार नाही WhatsApp मेसेज आपल्या मोबाईलवर WhatsApp मेसेज आल्यावर लगेच स्क्रीनवर तो नोटीफीकेशनद्वारे झळकू लागतो. त्यामुळे दुस-यांनाही मोबाईलवर कोणता मॅसेज आला आहे, हे कळून जाते. याला रोखण्यासाठी Settings मधील notificationsवर जा. नंतर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे Hide Sensitive notification content वर टॅप करा.मोबाईल स्क्रीनवर नाही येणार फालतू अॅड अनेकदा आपल्याला स्क्रीनवर जाहीरातींचे पॉप अप येत असतात. यांना बंद करण्यासाठी क्रोमवरील तीन डॉट्सवर क्लिक करा. नंतर सेटिंगमधील site Settingsवर टॅप करा. येथे Pop Upsचे ऑप्शन दिसतील. त्याला ऑन करा.

1. सुरुवातीला क्रोम ब्राऊझरला ओपन करा. वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन Privacy वर टॅप करा. येथे Do Not Track वर टॅप करुन त्याला ऑन करा. यानंतर तुमचा डाटा कोणीही ट्रॅक करु शकणार नाही. 2. गुगल क्रोमवर आपण जे काही सर्च करतो त्यावर पुर्ण नजर ठेवली जाते. त्या हिशोबानेच आपल्याला जाहिराती पाठवल्या जातात.

कुणीही वाचू शकणार नाही WhatsApp मेसेज आपल्या मोबाईलवर WhatsApp मेसेज आल्यावर लगेच स्क्रीनवर तो नोटीफीकेशनद्वारे झळकू लागतो. त्यामुळे दुस-यांनाही मोबाईलवर कोणता मॅसेज आला आहे, हे कळून जाते. याला रोखण्यासाठी Settings मधील notificationsवर जा. नंतर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे Hide Sensitive notification content वर टॅप करा.

मोबाईल स्क्रीनवर नाही येणार फालतू अॅड अनेकदा आपल्याला स्क्रीनवर जाहीरातींचे पॉप अप येत असतात. यांना बंद करण्यासाठी क्रोमवरील तीन डॉट्सवर क्लिक करा. नंतर सेटिंगमधील site Settingsवर टॅप करा. येथे Pop Upsचे ऑप्शन दिसतील. त्याला ऑन करा.
X
COMMENT