आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाच्या पहिल्या अक्षरावरून समजू शकतात स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो, ती त्या व्यक्तीची नाव राशी असते. यालाच चंद्र राशी असेही म्हणतात. सर्व 12 राशींचे वेगवेगळे नाम अक्षर आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीची रास समजते आणि त्याच्या भविष्यासोबतच स्वभावाची माहिती मिळू शकते. सर्व लोकांचा स्वभाव आणि भविष्य वेगवेगळे असते, परंतु काही राशी इतर राशींपेक्षा जास्त भाग्यशाली असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्वात 4 खास राशी ज्या इतर राशींपेक्षा वेगळ्या आहेत...


# मेष ( नाव अक्षर - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
ही राशीचक्रातील पहिली राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रहांचा सेनापती आहे. या लोकांमध्ये नेतृत्त्व करण्याची क्षमता अद्भूत असते. या क्षमतेमुळे हे लोक इतर राशींपेक्षा जास्त ताकदवान राहतात. मंगळ यांना मदत करतो. हे लोक कष्टाळू तसेच नेतृत्त्व क्षमतेमुळे यशस्वी आणि भाग्यशाली राहतात.


# वृश्चिक (नाव अक्षर- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
मेष राशीप्रमाणे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रहच आहे. मंगळ ग्रहामुळे या राशीचे लोक धाडसी राहतात. या राशीचे लोक कोणत्याही कामामध्ये व्यर्थ रिस्क घेत नाहीत. स्वतःचे काम प्रामाणिकपणे करतात. कष्टाच्या बळावर हे इतर राशींपेक्षा जास्त ताकदवान बनतात. हे लोक चांगले योजनाकार असतात. आपल्या योजनांमध्ये यशस्वी होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेवाचे स्वामित्व असलेल्या राशीच्या खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...