आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 100 रूपयांत बनवा मॅरेज सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन करण्याची ही आहे प्रोसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्या लग्नसराई सुरू आहे. पण लग्नाच्या तयारीत आपल्या लग्नासंबंधी असलेले कायदेशीर दस्तावेजांवर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट आवर्जुन बनवून घ्या. सुप्रीम कोर्याने मॅरेज सर्टिफिकेट अनिवार्य केले आहे. आता देशातील अनेक राज्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट बनत आहेत. पासपोर्टमध्ये वैवाहिक स्टेटस अपडेट करण्यासाठी, ज्वाइंट गृह कर्जासाठी, ज्वाइंट बँक खाते उघडण्यासाठी आणि कपल विजा घेण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता भासते. तर मग जाणून घ्या कशाप्रकारे ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट बनवता येते.

 

काय आहे मॅरेज सर्टिफिकेट
> मॅरेज सर्टिफिकेट दोघांना पति-पत्नी म्हणून ओळखण्याचे अधिकृत स्टेटमेंट आहे. भारतात हिंदू मॅरेच अॅक्ट 1955 आणि स्पेशल मॅरेच अॅक्ट 1954 च्या अंतर्गत नोंदणी केली जाते. मॅरेज सर्टिफिकेट आपण विवाहीत असल्याचा कायदेशीर पुरावा आहे. 

 

सुप्रीम कोर्टाने केले मॅरेच सर्टिफिकेट अनिवार्य 
> 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने लग्नाची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदू अॅक्टमध्ये मॅरेज रजिस्ट्रेशन आवश्यक केले आहे. 

 

कोठे बनते ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट
> कोर्ट आणि राज्य सरकारच्या वेबसाइटवर मॅरेज सर्टिफिकेट बनवता येते. दिल्ला, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांमध्ये राज्य सरकारच्या वेबसाइटवर मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म भरता येतो. सर्व राज्यांमध्ये मॅरेज सर्टिफिकेट बनविण्याची प्रोसेस सारखीच आहे.


ही आहे ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्याची प्रोसेस

> दिल्ली सरकारचे रेवेन्यू विभाग ई-डिस्ट्रिक्ट नावाने एक वेबसाइट चालवते. सरकरा यामार्फत जनतेला ऑनलाइन सुविधा देते.   


> सुरूवातीला httphttp://edistrict.delhigovt.nic.in/in/en/Account/Register.html या लिंकवर जा

> नवीन युजरने ई-डिस्ट्रिक्ट पोर्टलवर रजिस्टर करा. त्यांनतर स्क्रीनवर दिलेल्या सुचनांचे पालन करा.


> त्यानंतर आपल्या पतीची माहिती भरा आणि 'रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज सर्टिफिकेट' वर क्लिक केल्यानंतर फॉर्म डाउनलोड होईल. या फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावी आणि अपॉईंटमेंट ची तारीख निवडावी. सबमिट बटनवर क्लिक करून अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करा. 

> तुम्हाला एक टेम्परेरी नंबर मिळेल. हा नंबर अक्नॉलेजमेंट स्लिपवर देखील असेल. अॅप्लिकेशन फॉर्म आणि अक्नॉलेजमेंट स्लिपची प्रिंट घेण्यास विसरू नका. 

> अपॉईंटमेंटमध्ये सर्व निश्चित झाल्यानंतर आपले अॅप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यावर ई-डिस्ट्रिक्टच्या पोर्टलवर अॅप्लिकेशन नंबर टाकून मॅरेज सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. 

 


पुढे वाचा...अपॉईंटमेंट मिळण्याचा कालावधी किती?

बातम्या आणखी आहेत...