आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे बनवाल मोमाेज ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोमो एक खास तिबेटीयन पाककृती आहे. तिबेटसह हा खाद्यप्रकार संपूर्ण ईशान्य भारत, नेपाळ व हल्ली मुंबई, पुणे, औरंगाबादसारख्या शहरातदेखील झपाट्याने प्रसिद्ध होत आहे.


या पाककृतीमध्ये जरी चिकन वापरले असले तरी तुम्ही त्या जागी शाकाहारी मोमोजदेखील बनवू शकता.

  • साहित्य :

चिकन खिमा  ५०० ग्रॅम,मैदा  २ वाटी,कांदा १ वाटी बारीक चिरलेला,कोबी  १/२ वाटी,कांद्याची पात  १/२ वाटी,ढोबळी मिरची  १/४ वाटी, आले, लसूण २ चमचे बारीक चिरून,काळी मिरी पावडर १ चमचा,सोया सॉस १/२ चमचा,व्हिनेगर १/२ चमचा, मीठ चवीनुसार

  • कृती

थोडे मीठ टाकून पोळीच्या कणिकप्रमाणे मळून घ्यावा. चिकन खिमा स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे निथळत ठेवावा. कांदा, कांद्याची पात, कोबी, ढोबळी मिरची, आले, लसूण हे सर्व बारीक चिरून घ्यावे. कढईत तेल गरम झाल्यावर आले, लसूण टाकून परतून घ्यावे. आले, लसूण परतल्यावर कांदा टाकून परतावा. त्यामध्ये कोबी, ढोबळी मिरची टाकून परतावे. थोडा वेळ परतल्यावर त्यात चिकन खिमा टाकून चांगले परतून घ्यावे.खिमा थोडा शिजल्यावर व चिकनला सुटलेले पाणी पूर्णपणे आटल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर व काळी मिरी पावडर टाकून मिक्स करावे. चवीप्रमाणे मीठ व चिरलेली कांद्याची पात टाकून नीट हलवावे. हे तयार झालेले सारण ताटलीमध्ये काढून थोडा वेळ थंड होऊ द्यावे. मैद्याच्या बनवलेल्या कणकेमधून एक छोटा गोळा घेऊन त्याची छोटी पुरी लाटून घ्यावी. करंजीला सारण भरतो त्याप्रमाणे वरील गार झालेले चिकनचे सारण भरावे. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जर चुन्या घालता येत असतील तर त्या घालाव्यात किंवा त्याला तुम्ही मोदकांसारखा आकार देऊ शकता.  तेही न जमल्यास करंजीसारखा आकार द्यावा.हे मोमो तुम्ही तळून घेऊ शकता किंवा मोदकांप्रमाणे उकडून घेऊ शकता. हे मोमो शेजवान सॉससोबत गरम सर्व्ह करावे.

बातम्या आणखी आहेत...