Home | Business | Business Special | How to open LPG gas agency

एलपीजी गॅस एजंसी उघडण्याची संधी, कोणत्याही सिक्यूरिटी डिपॉझिट शिवाय करू शकता गुंतवणूक, होईल भरमसाठ कमाई...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 08:24 PM IST

गुंतवणूकी ऐवजी कंपनीचा स्टॉक मिळेल.

 • How to open LPG gas agency

  नवी दिल्ली- दिल्लीमध्ये एलपीजी गॅस एजंसी उघडण्याची संधी मिळत आहे. Go Gas कंपनीने यासाठीची जाहिरात प्रकाशित केली आहे. कंपनी एजंसी उघडण्यासाठी कोणतेही सिक्यूरिटी डिपॉझिट घेत नाहीये. म्हणजेच रजिस्ट्रेशन ते डीलरशीप आणि डिस्ट्रीब्यूशनसाठी डिपॉझिट देण्याची गरज नाही. पण एजंसी चालवण्यासाठी बेसिक इंफ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असेल. म्हणजेच गोदाम, डिस्ट्रीब्यूशन सेंटर आणि ऑफीस असणे गरजेचे आहे.

  येथे करा संपर्क
  कंपनीच्या कमर्शियल आणि नॉन कॉमर्शियल अशा दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या डिस्ट्रीब्यूशनची संधी असेल. यासाठी गो गॅसने जिल्हा आणि तालुका स्तरावर एजंसी उघडण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ज्यांना Go Gas एजेंसीची डीलरशीप हवी असेल, त्यांना 7666555560 वर संपर्क करावा लागेल. त्यासोबतच info@elitegogas.com वरूनदेखील संपर्क करू शकता. त्याशिवाय रिजनल ऑफीस 515-A अंसल चेंबर 2 भीकाजी कामा प्लेस नवी दिल्ली या पत्त्यावर जाऊनदेखील माहिती मिळवू शकता.

  एजंसी घेण्यासाठीची पात्राता
  अर्जदाराचे वय 21 ते 60 च्या दरम्यान असावे.
  अर्जदार एक भारतीय नागरीक असावा.
  अर्जदार कमीत-कमी 10वी पास असावा.
  अर्जदार अपंग नसावा.

  बेसिक इंफ्रास्ट्रक्चरची आवश्यकता
  अर्जदाराकडे एंजंसी उघडण्यासाठी स्वत:ची किंवा लीजवर असलेली जमीन असावी, जी ओव्हरहेड पॉवर ट्रांसमिशन आणि टेलीफोन लाइनपासून दुर असली पाहीजे. जमीन अशा ठिकाणी असावी, जिथे मालवाहू ट्रकला जाता येईल. सोबतच गुंतवणूक करण्याची क्षमता असावी. त्याशिवाय सिलेंडर पोहचवण्यासाठी स्वत:ची एक गाडी असावी. या पात्रता पुर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच एजंसी मिळेल.


  कोणत्या डॉक्यूमेंटची आवश्यकता आहे?
  रहिवासी आणि जात प्रमाणपत्र
  पॅन आणि आधार कार्ड
  जीएसटी नंबर
  जमीनचे डॉक्यूमेंट किंवा लीज सर्टिफिकेट

  या डॉक्यूमेंटच्या आधारे तुम्ही एजंसीसाठी अप्लाय करू शकता.

Trending