आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे न भरता मिळवा या स्मार्टफोन कंपनीची फ्रेंचायसी, फ्रेंचायसीसाठी भरवा लागणार फक्त एक फॉर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - चिनी कंपनी Xiaomi तर्फे देशभरात Mi स्टोरची फ्रेंयायसी घेण्याची ऑफर देण्यात येत आहे. Mi स्टोअरची फ्रेंयायसी घेण्यासाठी फक्त एक फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे. यासाठी फोन किंना टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. देशातील कोणताही साधारण नागरिक स्टोअर उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. विशेष बाब म्हणजे फ्रेंचायसी घेण्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नाहीये तर शाओमीतर्फे स्टोअर उघडण्यासाठी फंड देण्यात येणार असल्याची माहिती शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि शाओमी ग्लोबलचे व्हाइस प्रेसीडेंट मनु जैन यांनी दिली. दिल्ली येथे Redmi Note 6 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चिंगच्यावेळी ते बोलत होते.
 
फ्रेंचायसी घेण्यासाठी काय करावे 
> आपण जर Mi स्टोअरची फ्रेंचायसी घेण्यास इच्छुक असाल तर त्यासाठी तुम्हाला Mi store च्या वेबसाइट वर जाऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामध्ये तुमच्या निवासस्थानासह इतर माहिती भरावी लागणार आहे. फॉर्म भरताच आपल्याला फ्रेंचायसीसाठी सूजीबद्ध करण्यात येईल. त्यानंतरचा निर्णय Mi कंपनीचा असणार आहे. त्यांना तुमचे लोकेशन आणि माहिती आवडली तर तुम्हाला फ्रेंचायसी मिळणार आहे. ऑनलाइन शिवाय आपण Mi स्टोअरच्या हेल्पलाइनद्वारे याबाबत मदत घेऊ शकता. पण यासाठी थोडा अवधी आहे. 

अधिक माहितीसाठी पुढील स्लाइडर क्लिक करा.......

बातम्या आणखी आहेत...