आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जर तुम्हाला तरूणपणीच रिटायर व्हायचे असेल किंवा काम न करता इनकम हवी असेल तर, तुम्ही आता ती मिळवू शकता. याकरता तुम्हाला 15 वर्षासाठी सिस्टीमॅटीक इनंव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्य़े गुंतवणूक करावी लागेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, SIP मध्ये किती गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या महिन्याच्या खर्चाची व्यवस्था करू शकता.
15 वर्षानंतर होऊ शकता रिटायर
तुमचे वय जर 25 असेल आणि तुम्हाला 15 वर्षानंतर म्हणजेच 40 वर्षाचे असताना रिटाटर व्हायचे असेल तर तुम्हाला त्यावेळेपर्यंत 1 कोटींचा फंड बनवावा लागेल. रिटायर झाल्यानंतर हा फंड तुमच्या महिन्याचा खर्च पुर्ण करेल.
कसा बनेल 1 कोटींचा फंड
यासाठी तुम्हाला SIP मध्ये दर महिना 10 हजार रूपयांची इंनव्हेस्टमेंट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला दर वर्षाला गुंतवणूक 2000 रूपयांनी वाढवावी लागेल. जर तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला 12 टक्के रिटर्न मिळाले तर तुमच्या अकांउटमध्ये 15 वर्षानंतर 95 लाख रूपये असतील.
80,000 रूपयांची होईल फिक्स्ड इनकम
सर्टिफाइड फाइनांशिअल प्लानर तारेश भाटिया यांनी सांगितले की, तुमच्या पैशाला सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लानमध्ये गुंतवू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला वर्षाला 9 टक्के रिटर्न मिळून एक ठराविक रक्कम तुमच्या खात्यात येत राहिल. उदाहरणार्थ- जर तुमच्या खात्यात 95 लाख असतील आणि तुम्हाला 9 टक्के रिटर्न मिळाले तर दर महिना तुम्हाला 80 ते 85 हजार रूपये मिळतील. जास्त रिटर्न मिळाल्यावर इनकमही वाढेल. म्हणजेच एसडब्लूपी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमच्या फंडवर 10 ते 12 टक्के रिटर्न मिळतील.
काय आहे सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लान
सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लान म्हणजेच एसडब्लूपी एकप्रकारचा खास प्लान आहे, ज्यात तुम्ही एकरकमी पैसे गुंतवूण दर महिना किंवा वर्षाला एक ठरावीक रक्कम मिळवू शकता. हा सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान पेक्षा उलट काम करतो. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच SIP मध्ये जास्त फंड बनवण्यासाठी दर महिना एक ठराविक रक्क्म इंनव्हेस्ट करावी लागते. पण या प्लानमध्ये तुम्ही एक रकमी पैसे गुंतवू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.