Home | Jeevan Mantra | Dharm | How To Pray Lord Shiva, shravan 2018

श्रावणात करत असाल शिव मंत्राचा जप तर 9 गोष्टी लक्षात ठेवा, लवकर पूर्ण होतील सर्व इच्छा

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 12:02 PM IST

सध्या महादेवाचा प्रिय महिना श्रावण चालू असून या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

 • How To Pray Lord Shiva, shravan 2018

  सध्या महादेवाचा प्रिय महिना श्रावण चालू असून या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. शिव पूजेमध्ये महामृत्युंजय मंत्राचे विशेष महत्त्व आहे. या मंत्र जपाने मोठमोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. मृत्यूचे भय नष्ट होते. शत्रूंवर विजय प्राप्त होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या मंत्राचा जप करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


  महामृत्युंजय मंत्र
  ऊँ भूर्भुवः स्वः ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारूकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।


  या मंत्राचा सरळ अर्थ असा आहे की, आम्ही तीन नेत्र असलेल्या शिवशंकराची पूजा करत आहोत, महादेवच प्रत्येक जीवामध्ये शक्तीचा संचार करतात. संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करतात. महादेवाकडे आम्ही प्रार्थना करतो की, त्यांनी आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून मोक्ष प्रदान करावा.


  # मंत्र जप करताना लक्षात ठेवा या गोष्टी
  1.
  जप करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर एखाद्या शिव मंदिरात जाऊन किंवा घरातच शिवलिंगाची पूजा करावी.


  2. पूजेमध्ये शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप, मध, खडीसाखर या गोष्टी अवश्य अर्पण कराव्यात. दिवा लावावा.


  3. बिल्वपत्र, धोतरा, हार-फुल महादेवाला अर्पण करावेत. कापूर लावून आरती करावी.


  4. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी.


  5. मंत्राचा उच्चार अगदी स्पष्ट असावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

 • How To Pray Lord Shiva, shravan 2018

  6. एखाद्या शिव मंदिरात शिवलिंगासमोर पूर्व दिशेने मुख करून या मंत्राचा जप करावा.


  7. महादेवाच्या पूजेमध्ये स्वच्छता आणि पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यावे.

 • How To Pray Lord Shiva, shravan 2018

  8. सर्व प्रकारच्या अधार्मिक कार्यापासून दूर राहावे, अन्यथा पूजेचे फळ मिळणार नाही.


  9. मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीने कधीही आई-वडील आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये.

Trending