Home | Jeevan Mantra | Dharm | How To Pray To lord Ganesha And Goddess Parvati

मंगळवारी शुभ योग : या 5 उपायांनी मॅरीड लाइफच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात

रिलिजन डेस्क | Update - Aug 14, 2018, 10:57 AM IST

14 ऑगस्ट श्रावण मासातील पहिला मंगळवार आणि विनायक चतुर्थी, अंगारक योगामध्ये मंगळागौरी व्रतही आहे.

 • How To Pray To lord Ganesha And Goddess Parvati

  14 ऑगस्ट श्रावण मासातील पहिला मंगळवार आणि विनायक चतुर्थी, अंगारक योगामध्ये मंगळागौरी व्रतही आहे. यामुळे आजच्या दिवशी महादेव तसेच श्रीगणेश आणि देवी पार्वतीची विशेष पूजा करावी. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार या दिवशी करण्यात आलेल्या विशेष पूजेने मॅरीड लाइफशी संबंधित सर्व अडचणी नष्ट होऊ शकतात. जाणून घ्या, या मंगळवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.


  पहिला उपाय
  सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन किंवा घरातच श्रीगणेशाची पूजा करावी. पूजेमध्ये श्रीगणेशाला दुर्वा, लाल फुल, सुपारी अर्पण करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा.


  दुसरा उपाय
  देवी पार्वतीला लाल बांगड्या, लाल साडी आणि कुंकू अर्पण करावे. पूजा करावी. श्रीगणेश आणि देवी पार्वतीकडे घरच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.


  तिसरा उपाय
  श्रीगणेशाचा मंत्र श्री गणेशाय नमः आणि देवी पार्वतीचा मंत्र ऊँ पार्वत्यै नम: चा 108 वेळेस जप करावा. या मंत्राचा जप केल्याने देवाची लवकर कृपा प्राप्त होऊ शकते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • How To Pray To lord Ganesha And Goddess Parvati

  चौथा उपाय 
  श्रावण महिन्यात महादेव आणि देवी पार्वतीला सोबत प्रसन्न करण्यासाठी ऊँ उमामहेश्वराभ्यां नमः मंत्राचा जप करावा. महादेवाची पूजा करून या मंत्राचा जप करावा. हा मंत्र सर्व वैवाहिक अडचणी दूर करू शकतो.

 • How To Pray To lord Ganesha And Goddess Parvati

  पाचवा उपाय 
  वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर महादेवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा. श्रीरामाचे नामस्मरणही करू शकता. श्रीराम नाम स्मरणाने महादेव लवकर प्रसन्न होतात. 

Trending