आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोज सकाळी पंचदेवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. हे पंचदेव भगवान शिव, श्रीविष्णू, श्रीगणेश, देवी दुर्गा आणि सूर्यदेव आहेत. सूर्यदेव प्रत्यक्ष दिसणारे देवता आहेत. यामुळे यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी तांब्याच्या कलशाने अर्घ्य देणे. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित संक्षिप्त भविष्य पुराण अंकाच्या ब्राह्पर्वानुसार जाणून घ्या, सूर्य पुजेशी संबंधित खास गोष्टी...
1. ब्राह्मपर्वच्या सौरधर्ममधील सदाचरण अध्यायानुसार जे लोक सूर्यदेवाला अर्घ्य देतात, त्यांनी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे.
2. घराबाहेर पडल्यानंतर सूर्यदेवाचे मंदिर दिसल्यानंतर उभे राहून भगवान सूर्यदेवाला नमस्कार अवश्य करावा.
# या गोष्टीही लक्षात ठेवा...
> सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.
> सूर्यदेवासाठी रविवारी गुळाचे दान करावे.
> जल अर्पण करताना सूर्य मंत्र ऊँ सूर्याय नम:, ऊँ आदित्याय नम:, ऊँ भास्कराय नम: चा जप करावा.
# सूर्य पूजेने होतात हे लाभ
> ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती शुभ नसेल त्यांनी दररोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे सूर्याचे दोष दूर होऊ शकतात.
> सूर्यदेवाची कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो.
> सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने त्वचेची चमक वाढते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.