आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमध्ये आग लागल्याने आत बसलेला व्यक्तीचा मृत्यू, एक्सपर्ट्सने सांगितली कामध्ये आग लागण्याची 5 कारणे आणि 5 संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - रविवारी रात्री जयपूर-आगरा नॅशनल हायवेवर कारमध्ये आग लागली. या कारमध्ये बसलेला व्यक्ती या आगीमध्ये जीवंत जळाला. आग लागल्यानंतर व्यक्तीने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण सेंट्रल लॉक उघडले नाही त्यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही. आम्ही अॅटो एक्सपर्ट अंकित जोशी यांच्याशी याबाबत चर्चा करून आग कोणत्या परिस्थितीत लागते आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेतले. 


केव्हा लागू शकते कारमध्ये आग.. 
1. बॅटरीचे टर्मिनल लूझ असतील तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. 
2. बॅटरीचे मेंटनन्स न केल्यास अनेकदा त्यातून पाणी किंवा अॅसिड लीक होऊ लागते, तेही शॉर्ट सर्किटसाठी कारणीभूत ठरते. 
3. कोणत्याही प्रकारचे बाह्य उपकरण उदाहणार्थ-सेंट्रल लॉकिंग, ऑडियो सिस्टीम, पार्किंग कॅमेरा, हॉर्न, हेडलाइट हे लावल्यास त्याची वायरिंग व्यवस्थित झाली नाही तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. 
4. परफ्यूमसारखा ज्वलनशील पदार्थ गाडीत ठेवला तर अनेकदा त्याची वाफ तयार होते आणि तेही आग लागण्याचे कारण ठरू शकते. 
5. अनेकदा गाडीच्या जवळ उभे राहून लोक सिगारेट ओढतात. त्यानेही आग लागण्याची शक्यता असते. 


आग लागण्यापूर्वी मिळतात हे संकेत 
1. आग कधीही अचानक लागत नाही, तर त्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. शॉर्ट सर्किट झाले तर वायर जळाल्याचा वास अशा प्रकारचा संकेत असू शकतो. 
2. अनेकदा अचानक गाडीतून धूर निघताना दिसत असतो. 
3. अनेकदा गाडी चालवण्यामध्ये अडचणी येतात, तोही संकेत असू शकतो.  
4. अनेकदा स्पार्किंग होतानाही दिसत असते. 
5. यापैकी काहीही झाले तर लगेचच गाडी बंद करून बाहेर पडावे. मॅकेनिक बोलावून गाडी चेक करून घ्यावी. 


वचावासाठी हे करा.. 
- वर्षभरातून एकदा कारच्या बॅटरीचे मेंटनन्स करा. 
- अॅटो मेंटनन्स असणारी बॅटरी असली तरी ती 6 - 8 महिन्यात एकदा दाखवायला हवी. 
- गाडीमध्ये बाहेरून अॅक्सेसिरीज लावणे टाळा. लावल्या तरी त्यासाठी एक्सपर्टची मदत घ्या. म्हणजे वायरिंग व्यवस्थित होईल आणि अपघात टाळला जाईल. 
- गाडी खराब झाली असेल आणि लॉक उघडत नसेल तर काच तोडून लगेचच बाहेर यावे. आत बसून मॅकेनिकची वाट पाहू नये. 
- बाह्य उपकरणांमुळे कारला आग लागली तर इंश्युरन्स कंपन्याही पैसे देत नाहीत. त्याचा समावेश कारशी छेडछाड केलेल्या यादीत होतो. 

 

बातम्या आणखी आहेत...