आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचपासून महिला खेळाडूंना कसे वाचवाल?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक महिनाआधी, जलतरण प्रशिक्षक सुरजित गांगुलीने किशोरवयीन जलतरणपटूचा विनयभंग केल्याच्या व्हिडिओच्या धक्क्यातून भारतीय खेळात सुधारणा झाली. काही आठावड्यानंतर ही घटना खेळात आवड असलेल्यांपासून दूर झाली. जो घटनेसोबत राहिला तो कायम राहिला. आधी लोकांचा संताप, नंतर अधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देणे आणि नंतर अॅथलेटिकच्या भविष्याबाबत अंध:कार होणे. स्वत:ला विचारुन पहा, जेव्हाही खेळांमध्ये छेडछाडसारखी एखादी घटना होते तेव्हा हेच होत नसेल? गोव्याच्या घटनेच्या सुरुवातीला प्रशिक्षक गांगुली यांचे निलंबन करण्यात आले होते. असोसिएशनचे अध्यक्ष डिगंबर कामत यांनी विधानसभेत महिला प्रशिक्षकाची मागणी केली.  तसेच सचिव सैयद अब्दुल माजिद यांनी राजीनामा दिला. स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय अॅक्टिव स्पोर्ट‌्स बॉडी नाही. त्यामुळे एक योग्य पाऊल उचलत एसएफआयने २९ स्टेट युनिट्सला या कोचला सर्व पद्धतीचे प्रशिक्षणावर बंदी आणण्याचे सर्क्यूलर काढले. हा आदेश जरी कठोर वाटत होता. पण एसएफआयने त्यांच्या वेबसाइटवर घटनेबाबतची नोटीसदेखील टाकलेली नव्हती. महिना उलटल्यानंतर ती खेळाडू पुन्हा बंगालला परतली होती. पण गांगुली यांच्याविरुद्ध पॉक्सो अॅक्टच्या अंतर्गत गोवा पोलिसांकडून दाखल केलेल्या केसबाबत कुणाला काहीच माहिती नव्हती. होय, असोसिएशनचे सचिव माजिद यांची गोवा क्रिकेट असोसिएशनवर ज्वाइंट सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. अॅथलेटिक्सच्या सुरक्षेबाबत आणि अशा पद्धतीच्या घटनांपासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. असे जेव्हा घडते, परिणांमांमुळे काही प्रकरणे समोर येतात. त्यांचे काय झाले याची माहितीच कळत नाही. ज्यावेळी नॅशनल स्पोर्ट‌्स अॅडमिस्ट्रेशनसाठी छेडछाडीच्या प्रकरणांचा निपटारा करणे अनिवार्य आहे.? या कोडचे क्लॉज एक्स 'ऑपरेशनल इंटीग्रिटी' अंतर्गत नॅशनल स्पोर्ट‌्स फेडरेशन प्रक्रिया आणि दायित्वाच्या रुपात हे प्रकरणे, घटनांमध्ये कुठल्याही प्रकरचे लैगिक शोषण रोखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी पद्धती अवलंबल्या पाहिजे. दोन आठवड्यापूर्वी क्रीडा मंत्रालयाला बदलाबाबत पाठवलेल्या इमेललाही कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच मंत्रालय व गोवा स्वीमिंग असोशिएशनच्या संकेतस्थळावरही लैगिंक अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी समितीची घोषणा केली नाही. फेब्रुवारी २०१८ मध्ये अमेरिकेत लॅरी नासारच्या अत्याचाराचा खुलासा झाला. ज्यात १५० महिला जिमनास्टने डॉक्टरच्या विरोधात आवाज उठवला. ही घटना भारतीय खेळांसाठी मोठा इशाराच आहे. एवढे मोठे लैगिंक शोषण अनेक दशकांपासून सुरू असते, तेही प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या खेळात, भारतात तर काय असेल याचा विचारही न केलेला बरा. भारतीय खेळात गुरु-शिष्याची परंपरा जपली जाते. युवा एथलिस्ट आणि उपस्थित पुरुष यांच्यात अनुचित वर्तन दडपणे सहज होते. एथलिट आमच्या खेळात खुलेआम फिरणाऱ्या शिकारींना बऱ्याच वेळा इशाराही दिला जातो. छेडछाड, लैगिंक शोषणाशी संबंधित काही घटना समोर आल्या आहेत. एखाद्याने तक्रार केल्यानंतर एथलिटचे करिअर पूर्णत: बरबाद होते. जसे जुलै २०१० मध्ये महिला हॉकी खेळाडूंसोबत झाले. जेव्हा संघाचा व्हिडिओग्राफर बासवराज आणि कोच एमके कौशिकच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर खेळाडू पुन्हा भारताच्या बाजून खेळू शकला नाही. पुन्हा महिला बॉक्सरच्या बाजूने झाले तेव्हा तामिळनाडू बॉक्सिंग असोशिएशनचे एके करुणाकरणविरुद्ध मार्च २०११ मध्ये लैगिंक अत्याचाराची तक्रार दाखल झाली. त्यानंतर खेळाडू चेन्नई आणि दोन्ही खेळ सोडून निघून गेली. तसेच आंध्र क्रिकेट असोशिएशन बरखास्त केल्यानंतर लैगिंक शोषण प्रकरणातील आरोपी वी चामुंडेश्वर हा मोकाट होता. तसेच तो सप्टेंबर २०१९ मध्ये हैदराबाद बॅडमिंटन असोशिएशनचा प्रमुख होता. बीसीसीआय प्रमुख राहुल जौहरी वर मीटू प्रकरणी आरोप लागले त्या वेळी चौकशी समितीच्या एका सदस्याने लैगिंक अत्याचाराबाबत ट्रेनिंग दिल्याचे सांगितले होते. तर दोन सदस्यांनी साक्ष देणाऱ्या महिलेलाच चुकीचे ठरवले होते. अशा अनुभवांमुळे धोका हा आहे की, गोव्याची केससुद्धा याच पद्धतीने बेदखल होणार आहे. परंतु पीडितेला न्याय न मिळता उलट तिचे करिअर बर्बाद होईल आणि आरोपी न्याय व्यवस्थेच्या दारातून सही सलामत सुटतील. गोव्यातील या या खेळाडूच्या वडिलांच्या मतानुसार मुलीला हुगळी येथील अकादमीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण मुलगी घराजवळील तरण तलावात स्मीमिंगचा सराव करेल. गरज आहे खेळ मंत्रालय व व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी या घटनेतून सुधारले पाहिजे. अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या वर्तनात सुधारणेला चालना मिळेल. मागील वर्षी जूनमध्ये स्पोर्ट‌्स अथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्या प्रादेशिक कार्यालयातील कार्यरत अधिकारीद्वारे लैगिंक अत्याचाराच्या आरोपांवर डिसेंबरमध्ये एक समिती गठीत केली. तामिळनाडूमध्ये एक डझन पेक्षा जास्त हॉकी प्रशिक्षणार्थींच्या तक्रारी आल्या होत्या. चौकशीतून प्रशिक्षकच आरोपी निघाला. त्याला निवृत्ती मिळण्याआधीच निलंबित केले. परंतु नंतर समझोता होऊन त्याचे निवृत्ती वेतन सुरु करण्यात आले. त्यावेळी नीलम कपूर अथॉरिटीचे संचालक होती. आता निवृत्त झाली आहे. 'एडमिनिस्ट्रेटर्सला सारख्या घटनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. जर एखाद्याजवळ तक्रार करण्याची हिंमत असेल तर त्याचा सन्मान केला पाहिजे. त्या प्रकरणाची चौकशी जलदगतीने व्हावीे. कारण आरोपीला ज्ञात झाले पाहिजे की आता आपली सुटका नाही. भारतीय महिला खेळाडूंच्या लैगिंक अत्याचाराबाबत फारसे गंभीर नाहीत. लोकांचा समज आहे की, या गोष्टी चालतात, एखाद्या गोष्टीवर एवढे गहजब करण्याची काही गरज नाही, हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. गरज आहे खेळाच्या दुनियेत जनजागृतीची. याबाबत अभियान चालवले पाहिजे. क्रीडा संघ, खासगी अकादमी, कोच यांनाही या हक्क्ाची जाणीव असली पाहिजे. तरुण महिला खेळांबाबत कोचनेही विशेष दक्षता घेतली पाहिजे, हा तरुण खेळाडूंचा विशेष हक्क बनतो. शारदा उगरा सीनियर एडिटर, ईएसपीएन क्रिकइंफो  

बातम्या आणखी आहेत...