आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज डेस्क - तरूणीने बलात्काराचे खोटे आरोप केले. शासनाकडून निधी मिळवला. आणि नंतर मात्र आपल्या साक्षीवरून ती पलटली. अशा प्रकारच्या दोन घटना मध्यप्रदेशात घडल्या. या घटनांना मध्यप्रदेश हायकोर्टाने गंभीरतेने घेतले आहे. तसेच या दोन्ही प्रकरणातील आरोपींना जामीनावर मुक्त केले असून राज्य शासनाला आदेश दिला आहे की, कथित पीडितांकडून भरपाई रक्कम परत घेण्यात यावी. तसेच या तरूणींवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. पुढील 3 महिन्यांमध्ये तरूणींवर काय कारवाई केली, याचा अहवाल पोलिसांना हायकोर्टात सादर करावा लागणार आहे. येथे आम्ही तुम्हाला या 2 प्रकरणांबद्दल माहिती देत आहोत, जेणेकरून तुमच्याविरोधात कोणी खोटा गुन्हा दाखल केला तर त्यापासून आपला बचाव कसा करावा, हे तुम्हाला समजेल.
केस नंबर 1
- नरवर ठाण्यात लाखन नावाच्या व्यक्तीवर तरूणीने आयपीसी कलम 376,457 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
- त्यानंतर पोलिसांनी आरोपीला 3 एप्रिल, 2018ला अटक केली.
- जामिनासाठी हायकोर्टात तिस-यांदा अर्ज करताना आरोपीने म्हटले की, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणा-या तरूणीने आपल्याविरोधातील आरोप मागे घेतले आहेत.
- हायकोर्टाने आरोपीला सशर्त जामीन देत आरोपीला मुक्त करण्याचे आदेश दिले.
- तरूणीला राज्य शासनाकडून 3 लाख रूपये भरपाई रक्कम मिळाली होती. तरूणीने आपले आरोप मागे घेतल्यानंतर हे पैसे परत घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.
केस नंबर: 2
- बिरबल सिंहविरोधात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंबाह जिल्ह्यातील मुरैनोमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली.
- नंतर जामीनासाठी अर्ज करताना आरोपीने दावा केला की, ज्या घटनेच्या आधारावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या घटनेसंबंधीत साक्षीवरून पिडिता नंतर न्यायालयात न्यायाधीशांसमोर पलटली आहे.
- आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अधिका-यांना निर्देश दिले आहेत की, खोटी साक्षी देणा-या पिडितेची चौकशी केली जावी.
कोणी खोटा गुन्हा दाखल केला तर काय कराल?
- तुमच्या विरोधात खोटा एफआयर दाखल केला गेला तर तुम्ही याला आव्हान देऊ शकता. नंतर कोर्टात आपली बाजू मांडून तुम्हाला अटक टाळता येऊ शकते.
- चोरी, मारहाण, बलात्कार सारख्या प्रकरणांत तुम्हाला गोवले जात आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हायकोर्टात अपील करू शकता. हायकोर्टात केस चालू असताना पोलिसही तुमच्या कारवाई करू शकत नाही. इतकेच नव्हे तर तुमच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेले असले तरीदेखील पोलिसांना तुम्हाला अटक करता येत नाही. कोर्ट तपास अधिका-यांना तपासासंदर्भात निर्देशही देऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.