आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त रिटर्न देणारे इक्विटी म्युचुअल फंड गुंतवणूकदारांचे आवडते आहे. कारण, यात गुंतवणूक करणे जितके सोपे तितकेच पैसे काढणे देखील आहे. बहुतांश लोक म्युच्युअल फंडात आपला पैसा अडकून राहील. किंवा तो काढण्याची प्रोसेस किचकट असल्याचे समजून इनव्हेस्ट करत नाहीत. हाच गैरसमज दूर करण्यासाठी आपल्यासाठी आम्ही संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात मांडत आहोत.
म्युचुअल फंड युनिट रिडीम करण्याची प्रोसेस
- तुम्हाला म्युचुअल फंडचे युनिट रिडीम करायचे असेल म्हणजेच तुमचे पैसे काढायचे असतील तर याची प्रकिया कधीही करू शकता. तुम्हाला स्वत:ला हे काम करायचे असेल तर म्युचुअल फंड कंपनीच्या वेबसाइटवरून आधी ट्रांझॅक्शन स्लिप डाउनलोड करावी लागेल.
- या रिडेम्पशन अॅप्लिकेशनला तुम्हाला म्युचुअल फंड कंपनीच्या ऑफिसमध्ये जमा करवी लागेल किंवा म्युचुअल फंड कंपनीच्या ऑनलाइन सुविधेचा देखील वापर करू शकता. अनेक म्युचुअल फंड कंपन्या त्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन रिडेम्पशनची सुविधा देत आहेत.
इतक्या वेळात येतील अकाउंटमध्ये पैसे
जर तुम्ही लिक्विड किंवा डेट ओरिएंटेड म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला एक किंवा दोन दिवसात पैसे मिळून जातील. इक्विटी फंडमधले पैसे 4-5 दिवसात अकाउंटमध्ये येतात.
अशा पद्धतीने मिळतील म्युचुअल फंडचे पैसे
जर तुम्ही तुमचे बँक डिटेल दिले असेल तर, म्युचुअल फंडचे यूनिट रिडीम केल्यानंतर मिळणारे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यात येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.