आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • How To Register Complaint At National Anti Profiteering Authority And How This Body Works

GST/ जर तुमच्याकडून कोणी जास्त जीएसटी वसुल करत असेल, तर Anti profiteering authority कडे जाऊन दाखल करू शकता तक्रार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर एखादा व्यापारी किंवा संस्था आपल्याकडून जास्त जीएसटी वसुल करत असेल किंवा गैरवापर करून पैसे घेत असेल तर आपण नॅशनल अॅंटी-प्रॉफिटीअरिंग अॅथॉरिटी (National Antiprofiteering Authority, NAA) कडे तक्रार दाखल करू शकता. व्यापारी वर्ग जीएसटीचा गैरफायदा घेऊ नयेत यासाठी शासनाने जीएसटी कायद्या अंतर्गत ही संस्था स्थापन केली आहे.


ग्राहकांचे हित ही संस्थेची जबाबदारी
या संस्थेचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे, 'जीएसटी काउंसिल' वस्तू व सेवांच्या जीएसटी दरात जी कपात करते, त्याचा फायदा ग्राहकांना मिळावा या दृष्टीने काम करणे. म्हणजे व्यापारी वर्ग जीएसटी दरात कपात केल्यानंतर सेवांचे दर कमी करत आहे कि नाही, त्यावर ही संस्था लक्ष ठेवते. जर एखादा व्यापारी जीएसटी दरात कपात करूनसुद्धा वस्तुच्या दरात कपात करत नसेल, तर संस्था या व्यापाऱ्यांवर योग्य ती कारवाई करते.  

 

अशी दाखल करा तक्रार
एनएएकडे कोणताही व्यक्ती सहज आपली तक्रार दाखल करू शकतो. तक्रारीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घ्या ऑनलाईन तक्रारीच्या या तीन पायऱ्या...

 

1. रजिस्ट्रेशन:
सर्वात आधी आपल्याला एनएएच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी आपल्याला रिजस्ट्रेशन फॉर्ममध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जो ई-मेल आयडी दिला आहे त्यावर एक ई-मेल येईल. या मेलमध्ये दिलेल्या व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करून आपल्याला वेबसाइटच्या लॉग-इन पेजवर जाता येईल.


2. लॉग-इन
आपण रजिस्टर्ड मेल-आईडी आणि पासवर्ड उपयोग करून कधीही लॉग-इन करू शकता. यामध्ये आपल्याला खालील 4 पर्याय मिळतील
-तक्रार दाखल करा
-कम्प्लेंट ट्रॅक करा
-कम्प्लेंट्सची हिस्ट्री चेक करा
-अपला प्रोफाइल एडिट करा


3. तक्रार दाखल करा
या ठिकाणी यूजरला एक तक्रार अर्ज दिला जाईल, ज्यामध्ये माहिती भरण्यासोबतच पुरावेसुद्धा जमा करावे लागतील. तुमच्याकडे असलेल्या पुराव्यांना .jpg, .pig, .doc किंवा .pdf फॉर्मेटमध्ये अपलोड करता येते. तक्रार अर्ज पुर्ण झाल्यानंतर यूजरजवळ कम्प्लेंट-आईडी येईल. म्हणजे याद्वारे आपण कम्प्लेंट ट्रॅक करू शकतो. 


तक्रार दाखल केल्यानंतर ट्रॅक करता येईल
एकदा तक्रार दाखल केल्यानंतर आपण पाहू शकता की त्यावर काहा कारवाई झाली आहे की, नाही.यासाठी आपल्याला मेल-आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग-इन करावे लागेल आणि तेथे दिलेल्या चार पर्यायांपैकी ट्रॅक कम्प्लेंटवर क्लिक करावे लागेल. यानंतर जे पेज उघडेल त्यामध्ये आपला कम्प्लेंट आयडी आणि कॅप्चा लिहावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर तक्रारीचे संपूर्ण स्टेटस येईल.


फक्त दोन वर्षांसाठी संस्थेची स्थापना
नॅशनल अँटी-प्रॉफिटीयरिंग अॅथॉरिटीला फक्त दोन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली आहे. जीएसटी लॉन्च झाल्यानंतर जुलै, 2017मध्ये याला लागू केले गेले होते. या संस्थेच्या स्थापनेचा मुळ उद्देश होता की, जीएसटीमध्ये झालेली कोणतीही कपातीमुळे ग्राहकांचे नुकसान होता कामा नये. या संस्थेला जुलै महिन्यात दोन वर्ष पुर्ण होत आहेत पण संस्थेचा कार्यकाळ दोन वर्षासाठी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संस्थेकडे ग्राहकांच्या भरपूर तक्रारी आल्या आहेत,त्यामुळे या सर्व तक्रारी सोडवण्यासाठी वेळ लागत आहे.विशेष म्हणजे पेट्रोलियमसारखे अनेक महत्वाचे सेक्टर जीएसटीच्या बाहेर आहेत. म्हणून टॅक्स स्लॅबमध्येसुद्धा बदल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे NAA ची जबाबदारी वाढली आहे. 


मोठ्या कंपन्यावर बसला दंड
NAA संस्थेने अनेक मोठ्या कंपन्यावर गैरवापर केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये हिंदुस्तान यूनिलिव्हरचा (Hindustan Unilever) समावेश आहे, या कंपनीने जीएसटीचा दर बदलण्याचा लाभ ग्राहकांनी न देता स्वतः 535 कोटींचा आर्थिक फायदा घेतला. Domino’sची   फ्रैंचायजी Jubilant Foodworks ने 41.42 कोटींचा फायदा घेतला. Abbott Healthcare ने 96 लाख रुपए आणि McDonald’s ची फ्रैंचाइजी Hardcastle Restaurants ने 7.49 कोटी रूपयांचा फायदा घेतला. या संस्थेने या सर्व कंपन्याविरूद्ध ऑर्डर पास केली आहे.

बातम्या आणखी आहेत...