आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शरीरावरील वाढलेले केस अनेक वेळा आपल्याला लाजीरवाने करतात. हे केस काढण्यासाठी शेविंग खुप त्रासदायक असते. खरे तर घरीच काही सोपे उपाय सतत केल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते. मुंबईची पर्सनल केयर एक्सपर्ट अंजू गर्ग सांगत आहेत हेयर रिमूवलच्या काही नॅचरल टिप्स... सावधगिरी बाळगणे आहे आवश्यक...
ब्यूटीशियन स्वाती खिलरानी सांगतात की, पर्मानेंट सोल्यूशन नाही. हे करण्याअगोदर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर स्किनमध्ये इरिटेशन होत असेल तर हे ट्राय करु नका. यानंतर मॉइश्चरायजर अवश्य लावा.
- लिंबूच्या रसामध्ये साखर मिसळून लावा. 20 मिनिटांनंतर हलक्या हाताने घासून गरम पाण्याने धुवून घ्या.
- हळद पावडर, बेसन आणि मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा ती बॉडीवर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून दूर करा.
- कच्च्या अंड्यामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून नको असलेल्या केसांना लावा. सुकल्यानंतर हळुहळू केसांच्या विरुध्द दिशेने काढा.
- कच्ची पपई आणि 1 चमचा हळद पावडरची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मालिश करुन काढा.
- 1 चमचा दही, 1 चमचा साय आणि 1 चमचा मोहरीची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हळुहळू घासून काढा.
- नको असलेल्या केसांची जागा ओली करुन त्यावर ब्राउन शुगर घासावी. काही दिवसात केस कमी होतील.
- भीजवलेली डाळ, कच्चे बटाटे, मध आणि लिंबूचा रस पेस्ट बनवून लावा. 30 मिनिटांनंतर घासून काढा.
- कोमट पाण्यात मीठ टाकून कॉटनच्या कापडाने बॉडी मसाज करा. काही दिवासांमध्ये केस कमी होणे सुरु होईल.
- कॉफीचे बीज आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हलक्या हातांनी घासून काढा. काही दिवसात फरक जाणवेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.