आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्याला आराम देणारे 'डार्क मोड' सगळ्याच फोन्सची बॅटरी वाचवत नाही, डार्क मोड म्हणजे काय जाणून घ्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - सध्या अॅपलनेही 'आयओएस13' मध्ये डार्क मोड देण्याचे ठरवले आहे. यामुळे डार्कमोडचे महत्व वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी गुगलने 'अँड्रॉइड क्यू' मध्ये तर मॅक आणि विंडोज 10 मध्ये डार्कमोड उपलब्ध होते. 'डार्कमोड'मुळे बॅटरीची बचत होते असे म्हटले जाते. पण खरंच असे आहे का? याबाबत आपण जाणून घेऊयात... 


काय आहे डार्क मोड?
डार्क मोड हे एक फीचर आहे. यामुळे डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमची कलर थीम बदलून काळी किंवा त्या रंगासमान करते. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. यासोबतच डार्कमोडमुळे डिवाइसच्या बॅटरीची बचत होते. 


डार्कमोडसाठी ओएलईडी डिस्प्ले असणे गरजेचे
आपल्या डिवाइसमध्ये ओएलईडी डिस्प्ले असल्यावर बॅटरीची बचत होण्यास फायदा होतो. कारण ओएलईडीमध्ये पिक्सल बंद होतात. डार्कमोडमध्ये हे पिक्सल पावर खेचत नाही त्यामुळे साहजिकच बॅटरीची बचत होते असे म्हणता येईल. पण एलसीडी डिस्प्लेच्या बाबतीत असे घडत नाही. मोड कोणता आहे याबाबत एलसीडीला काहीही फरक पडत नाही. फक्त पावर सप्लाय व्यवस्थित असायला हवा. यामुळे एलसीडीमध्ये बॅटरी बचतीचा प्रश्नच उद्भवत नाही. 


कोणत्या फोनमध्ये आहे ओएलईडी
अॅपलच्या iPhone X, XS आणि XS Max या फोनमध्ये ओएलईडी स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे. आयफोन एक्सआर आणि एक्सच्या पूर्वीच्या सर्व फोन्समध्ये एलसीडी वापरण्यात आले आहे. सॅमसंग फोनमध्ये विशेषतः Galaxy S आणि Note सीरीजमध्ये ओएलईडीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय इतर काही फोन्समध्ये ओएलईडी देण्यात आला आहे. त्याविषयी माहिती डिवाइसच्या स्पेसिफिकेशनमध्ये डिस्प्ले कॅटेगिरीत मिळेल.


डार्कमोडचा किती परिणाम होतो?
डार्कमोडच्या वापराने जवळपास एका तासाची बॅटरी लाइफ जास्त मिळते. पण अनेक महिन्यांच्या हिशोबाने याकडे पाहिल्यानंतर हा फरत जाणवतो. कमी बॅटरी खपत म्हणजे कमी चार्ज आणि कमी चार्ज मध्ये बॅटरीचे जास्त आयुष्य आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...