Home | Business | Gadget | how to scheduled massage or email for later time

फक्त एका अॅपच्या मदतीने शेड्यूल करु शकता मॅसेजेस आणि मेल्स, जाणून घ्या या 8 स्टेप्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 03:44 PM IST

जर आपल्याला एखाद्याला थोडा वेळाने मॅसेज किंवा मेल करायचा असेल, तर आपण अनेकदा विसरुन जातो.

 • how to scheduled massage or email for later time

  गॅजेट डेस्क. जर आपल्याला एखाद्याला थोडा वेळाने मॅसेज किंवा मेल करायचा असेल, तर आपण अनेकदा विसरुन जातो. हे टाळण्यासाठी आपण रिमाइंडर सेट करु शकतो. परंतू आम्ही तुम्हाला अशा अॅपविषयी सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन रिमाइंडर तर सेट केला जाऊ शकतो, यासोबतच याच्या मदतीने मॅसेज शेड्यूलही केले जाऊ शकतात. याची मदत फेसबुक, ट्विटर, जीमेल किंवा एसएसएसवर मॅसेज किंवा पोस्ट शेड्यूल करण्यासाठी होऊ शकते. मॅसेज शेड्यूल केल्यावर हे अॅप योग्य वेळी त्या व्यक्तीला मॅसेज पाठवेल.

  ही आहे स्टेप बाय स्टेप पध्दत:

  स्टेप्स पध्दत
  स्टेप 1 सर्वात पहिले प्ले स्टोरमध्ये जाऊन आपल्या स्मार्टफोनमध्ये Do It Later नावाचे अॅप इंस्टॉल करा.
  स्टेप 2 - यानंतर अॅप ओपन करा आणि नंतर अॅपच्या खालच्या भागात दिलेल्या (+) आयकनवर टॅप करा.
  स्टेप 3 - यावर टॅप करताना एसएमएस, ईमेल, रिमाइंड, फेसबुक आणि ट्विटरचे ऑप्शन दिसेल. यामधून ज्यासाठी शेड्यूल करायचे आहे, ते सिलेक्ट करा.
  स्टेप 4 - फेसबुक किंवा ट्विटर सिलेक्ट केल्यावर साइन इन करण्यास सांगितले जाईल. आता यूजर नेम आणि पासवर्ड टाकून साइन-इन करा.
  स्टेप 5 - मॅसेज किंवा ईमेल सिलेक्ट केल्यावर अॅप कॉन्टेक्ट आणि मॅसेजला एक्सेस करण्याची परवाणगी मागेल. परवाणगी दिल्यानंतर ज्या मेल आयडीने मेल पाठवायचा आहे ते सिलेक्ट करा. एसएमएस पाठवायचा असेल तर सिम कार्डविषयी विचारण्यात येईल.
  स्टेप 6 - यानंतर To समोर देलेल्या बॉक्समध्ये ज्याला मेल किंवा एसएमएस करायचा आहे, त्याचा मेल आयडी किंवा मोबाइल नंबर टाकून समोर दिलेल्या (+) आयकॉनवर टॅप करा.
  स्टेप 7 - यानंतर सब्जेक्ट आणि बॉडी लिहून खाली दिलेल्या कॅलेंडरवरुन डेट आणि टाइम गरजेनुसार निवडा.
  स्टेप 8 - डेट आणि टाइम सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते रिपीटचे ऑप्शनही सिलेक्ट करु शकता. यानंतर ठराविक वेळेनंतर तोच मॅसेज पुन्हा एकदा पाठवण्यात येईल. यासोबतच Ask before sending समोर दिलेल्या बॉक्सवर क्लिक केल्यावर शेड्यूल्ड टाइमवर अॅप एकदा कंफर्मेंशन घेईल आणि मॅसेज पाठवेल.

  अॅप यूज करणा-यांच्या प्रतिक्रिया

  माझ्यासाठी हे फनटास्टिंक अॅप आहे. अनेक वेळा मला रात्री उशीरा एखाद्याला मॅसेज करायचा असतो आणि मी ते विसरुन जायचो. परंतू या अॅपच्या मदतीने आठवड्यापुर्वीच मी मॅसेज शेड्यूल करतो.
  - प्ले स्टोरवर पाच स्टार देणारा रेयान

  अनेक बाबतीत हे अॅप खुप चांगले आहे, परंतू मेलच्या बाबतीत यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. अनेक वेळा मला मेलचा रिप्लाय शेड्यूल करायचा असतो. परंतू यामध्ये याची सुविधा मिळत नाही.
  - प्ले स्टोरवर तीन स्टार देणारा एडम ब्यूडोइन

Trending