फोन चोरी झाल्यास उपयोगी पडते ही सेटिंग, नेहमी ठेवा सुरू; 19 वर्षीय मुलीने शोधला होता चोरी झालेला फोन

दिव्य मराठी वेब टीम

Apr 26,2019 02:38:00 PM IST


गॅझेट डेस्क - स्मार्टफोन मधील डेटा सेफ्टीसाढी युझर्स विविध प्रकारचे लॉक आणि सिक्युरिटी फीचर्सचा वापर करतात. खरं पाहता डेटासोबत फोन चोरी होऊ नये किंवा हरवू नये यासाठी आपण तयार राहिले पाहिले. अनेकवेळा फोन चोरी झाल्यानंतर युझर्स हताश होतात. पण काही सेटिंगच्या मदतीने फोनच्या लोकेशनपर्यंत सहज पोहोचता येते. मुंबईत राहणारी 19 वर्षीय जीनत बानो हकने आपला चोरी झालेला फोन स्वतः शोधून काढला होता.


गूगलची सेटिंग करणार तुमची मदत

चोरी झालेला फोन शोधण्यासाठी तुम्हाला काही सेटिंग करण्याच आवश्यकता आहे. अँड्राईड फोन वापरण्यासाठी Gmailचे अकाउंट तयार करणे गरजेचे आहे. या अकाउंटच्या मदतीने फोनमध्ये अनेक अॅप्स इन्स्टॉलेशनसोबत इतरही कामे होतात. फोनमध्ये अकाउंट लॉगइन केल्यापासून तुमच्या अॅक्टीव्हिटी देखील सेव्ह होत असतात. तुम्ही काय डाउनलोड केले? काय सर्च केले? कोणते गाणे-व्हिडिओ बघितले? तुमच्या फोनचे लोकेशन कोणते आहे? यामध्ये क्रोम, अँड्राईड सर्च, जाहीराती, इमेज सर्च, गूगल न्यूज यासांरखी वेगवेगळी कॅटेगिरी असते. युझरची इच्छा असेल तर या अॅक्टीव्हिटी डिलीट देखील करू शकतो. यासाठी My Activity वर जाऊन Gmail लॉगिन करावे लागते.

लोकेशन नेहमी ऑन ठेवा

गूगलवर Find your phone सर्च करा. येथे येणाऱ्या पहिल्या लिंकला ओपन करा. तेथे तुमचा हॅण्डसेट मॉडल दिसेल. येथून तुम्ही तुमच्या फोनच्या लोकेशनची माहिती मिळवू शकता. पण यासाठी फोनचे GPS ऑन असणे गरजेचे आहे. फोनला पासवर्डच्या मदतीने तुम्हा लॉक देखील करू शकता. सोबतच फोनचा शोध घेण्यासाठी 'This phone is lost. Please help give it back'असा मेसेज टाकून दुसरा एखादा फोन नंबर देखील देऊ शकतात. तुम्ही येथून फोनमधील सर्व डेटा डिलीट करू शकतात.

जीनतने गूगलच्या मदतीने शोधला होता फोन

जीनते वर दिलेल्या सेटिंगच्या मदतीने आपला चोरी झालेला फोन ट्रॅक केला. यानंतर ती फोन चोरी करणाऱ्या सेलवाराज शेट्टी या व्यक्तीपर्यंत पोहोचली. तो शहर सोडून पळून जाणार होता. पण जीनतने RPF च्या मदतीने त्याला पकडले.

X
COMMENT