गॅस सिलिंडरला आग / गॅस सिलिंडरला आग लागल्यास घाबरु नका, या तीन पद्धतीने काही सेकंदात विझेल आग

दिव्य मराठी वेब टीम

Sep 15,2018 02:59:00 PM IST

युटिलिटी डेस्कः सिलिंडरला आग लागल्याने किंवा त्याचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांविषयी आपण ऐकतच असतो. पण सिलिंडरला जर आग लागली तर ती अतिशय सोप्या पद्धतीने विझवता येऊ शकते. अनेकदा आग लागल्यानंतर लोक घाबरुन जातात आणि एका चुकीने घटनेचे मोठ्या दुर्घटनेच रुपांतर होते. पण हे टाळता येऊ शकते.

# सिलिंडरमध्ये येथे लागते आग
- सिलिंडरच्या नॉब किंवा मग पाइप लीक होणा-या ठिकाणी आग लागते.
- LPG ची खास गोष्ट म्हणजे आग रिव्हर्समध्ये पकडत नाही. म्हणझे गॅस ज्या दिशेने असेल, त्याच दिशेने आग लागते.
- सोबतच्या जेवढ्या भागात गॅस पसरतो, तेवढ्याच भागात आग लागते.

# व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय व्हिडिओ...
- सध्या व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये पोलिस अधिकारी मुस्लिम महिलांना गॅस सिलिंडरमध्ये लागलेल्या आगीपासून बचाव करण्याच्या टिप्स देत आहेत.
- ते एका सिलिंडरचा नॉब ओपन करतात, येथून गॅस निघतोय आणि माचिसने त्याठिकाणी आग लावतात.
- त्यानंतर दोन पद्धतीने ती आग विझवली जाते. पहिल्या पद्धतीमध्ये गॅस सिलिंडरवर प्लास्टिकची बादली लावली जाते, ज्यामुळे आग विसते. त्यानंतर सिलिंडरचा नॉब बंद केला जातो.

- दुस-या पद्धतीत ते नॉबवर बोट ठेवतात आणि त्यामुळे आग विझते. त्यानंतर नॉब बंद केला जातो.
- याशिवाय प्रात्यक्षिक दाखवणा-या पोलिस अधिका-यांनी सांगितल्यानुसार, सिलिंडरवर ओली ब्लँकेट टाकल्यानेही आग विझू शकते.

X
COMMENT