Home | Jeevan Mantra | Dharm | How To Take Bath In Morning

शास्त्रामध्ये वेळेनुसार सांगण्यात आले आहे स्नानाचे वेगवेगळे नाव, तुम्ही कोणते स्नान करता?

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 12:01 AM IST

शास्त्रामध्ये दिवसातील सर्व आवश्यक कार्य करण्यासाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. स्नान करतानाही आपण मंत्र जप करावा

 • How To Take Bath In Morning

  शास्त्रामध्ये दिवसातील सर्व आवश्यक कार्य करण्यासाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. स्नान करतानाही आपण मंत्र जप करावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार स्नान करताना एखाद्या स्तोत्राचा पाठ केला जाऊ शकतो. असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. वाईट काळ आणि सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


  स्नान करताना खालील मंत्राचा जप करणे श्रेष्ठ राहते...
  गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
  नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।


  अर्थ - हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी नद्यांनो, माझ्या स्नान करण्याच्या या पाण्यामध्ये तुम्हीही यावे.


  कोणत्या वेळी केलेल्या स्नानाला काय म्हटले जाते
  - ब्रह्म स्नान :
  सकाळी-सकाळी ब्रह्म मुहूर्त म्हणजे जवळपास 4-5 वाजता देवाचे स्मरण करत केलेले स्नान ब्रह्म स्नान असते. असे स्नान करणाऱ्या व्यक्तीला कुलदैवतेची विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनात दुःखांचा सामना करावा लागत नाही.


  - देव स्नान : सध्याच्या काळात बरेच लोक सूर्योदयानंतर स्नान करतात. जे लोक सूर्योदयानंतर एखाद्या नदीमध्ये स्नान करतात किंवा घरातच विभिन्न नद्यांचे नामस्मरण करत स्नान करतात, याला देव स्नान असे म्हणतात. अशा प्रकारे स्नान केल्यास व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात.


  - ऋषी स्नान : जे लोक सकाळी-सकाळी आकाशामध्ये तारे दिसत असताना स्नान करतात, त्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्नानाचे इतर प्रकार...

 • How To Take Bath In Morning

  - सामान्यतः जे स्नान सूर्योदयापूर्वी केले जाते त्याला मानव(मनुष्य) स्नान म्हणतात. सूर्योदयापूर्वी केलेलं स्नानच सर्वश्रेष्ठ असते.

 • How To Take Bath In Morning

  - सध्याच्या काळात सूर्योदयानंतर चहा-नाश्ता झाल्यानंतर बरेच लोक स्नान करतात. अशा प्रकरच्या स्नानाला दानव स्नान म्हणतात. 


  - शास्त्रानुसार आपण ब्रह्म स्नान, देव स्नान किंवा ऋषी स्नान करावे. हे सर्वश्रेष्ठ स्नान आहे.

Trending